
Randhir Kapoor Against Karisma-Sunjay Marriage : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा 2002 साली साखरपुडा झाला होता. लोक त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते पण अचानक त्यांचं लग्न मोडल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर लगेचच पुढल्या वर्षी, 2003 साली करिश्माने दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले. या जोडप्याला मुलगी समायरा आणि मुलगा कियान, अशी दोन मुलं आहेत.
मात्र, करिश्मा आणि संजय यांचे लग्न काळाच्या कसोटीवर फार काळ टिकलं नाही. करिश्माने संजयवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तर संजयने आरोप केला होता की करिश्माने केवळ पैशासाठी त्याच्याशी लग्न केले होते. अत्यंत कडवट आणि बराच काळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर, अखेर 2016 साली त्यांचा घटस्फोट झाला. पण करिश्मा कपूरचे वडील, रणधीर कपूर हेच या लग्नामुळे खुश नव्हते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
तो थर्ड क्लास माणूस.. रणधीर कपूर संजयवर का भडकले होते ?
2016 मध्ये हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर यांनी संजयवर निशाणा साधत टीका केली होती. “संजय हा थर्ड क्लास माणूस आहे. सर्वांना आमची प्रतिष्ठा माहिती आहे. आम्ही कपूर आहोत. पैशांसाठी आम्हाला कोणाच्याही मागे धावण्याची गरज नाहीये. आम्हाला फक्त पैशांचा आशिर्वाद मिळालेला नाही, तर आमच्याकडे जी कला आहे ती आयुष्यभर आमची साथ देईल” असे म्हणत रणधीर यांनी संजयच्या आरोपांवर उत्र देत ते फेटाळून लावले.
करिश्मा-संजयच्या लग्नाला रणधीर यांचा होता विरोध
रणधीर पुढे म्हणाले की, त्यांनी सुरुवातीपासूनच या लग्नाला विरोध केला होता. ” करिश्माने त्याच्याशी लग्न करावे असं मला कधीच वाटत नव्हते. त्याने कधीही आपल्या पत्नीची काळजी घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. तो तिला (करिश्मा) फसवतोय आणि दुसऱ्या महिलेसोबत राहतोय. तो कसा आहे हे संपूर्ण दिल्लीला माहीत आहे, मला यापेक्षा जास्त काहीच बोलायचं नाही “, असंही ते म्हणाले होते.
संजय कपूरने करिश्माला दिली 70 कोटींची पोटगी
वर्षानुवर्षे चाललेल्या वादानंतर, करिश्मा आणि संजय कपूर यांचा अखेर 2016 साली घटस्फोट झाला. डीएनएच्या वृत्तानुसार, संजयने करिश्माला पोटगी म्हणून 70 कोटी रुपये दिले. एएनआयच्या एका वृत्तानुसार, त्याने त्याच्या दोन मुलांसाठी 14 कोटी रुपयांचे बाँड गुंतवले होते, ज्यावर त्याला दरवर्षी 10 लाख रुपये व्याज मिळतं. याशिवाय, त्याने त्याच्या वडिलांच्या मालकीच्या घराची मालकी करिश्माला हस्तांतरित केली होती.
12 जूनला संजय कपूरचं निधन
दरम्यान गेल्या आठवड्यात, अर्थात 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना संजय कपूरचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने मधमाशी गिळली होती, ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर अद्यापही अंत्यसंस्कार झालेले नाहीत. त्याच्या मृत्यूमुळे उद्योग जगताला मोठा धक्का बसला असून कपूर कुटुंबीयही हादरलेत.