AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अमिताभ काका यांच्यासोबत लिपलॉक म्हणजे…’, राणी मुखर्जी हिचं मोठं वक्तव्य

अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी याच्यांतील लिपलॉक सीन, लिपलॉक सीनच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्यानंतर जया बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय..., ज्यामुळे अभिषेक बच्चन याचं झालं मोठं नुकसान... राणी मुखर्जी हिने केलं होतं मोठं वक्तव्य...

'अमिताभ काका यांच्यासोबत लिपलॉक म्हणजे...', राणी मुखर्जी हिचं मोठं वक्तव्य
| Updated on: Dec 29, 2023 | 2:39 PM
Share

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : अभिनेत्री राणी मुखर्जी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता, जेव्हा राणी मुखर्जी हिच्यासमोर अनेक प्रसिद्ध अभिनेत्री फेल होत्या. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत राणी मुखर्जी हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज राणी अभिनय क्षेत्रात पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली, तरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. राणी मुखर्जी हिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ब्लॅक’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. दिग्दर्शक संजय लिला भंसाळी दिग्दर्शित ‘ब्लॅक’ सिनेमाने तीन राष्ट्री पुरस्करांवर देखील नाव कोरलं.

‘ब्लॅक’ सिनेमात राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये एक लिपलॉक सीन दिला होता. ज्यमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. एवढंच नाही तर, यावर अभिनेत्या जया बच्चन देखील हैराण झाल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेल्या लिपलॉक सीनवर राणी हिने मोठं वक्तव्य देखील केलं होतं.

मुलाखतीत राणी मुखर्जी म्हणाली होती, ‘मी सांगू नाही शकत की तो लिपलॉक किती विचित्र होता. ते माझे अमिताभ काका आहेत आणि त्यांच्यासोबत लिपलॉक प्रचंड कठीण होतं. आम्हाला सीनच्या इंटिमेसी आणि गंभीरतेकडे लक्ष द्यायचं होतं.’ रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन आणि रणी मुखर्जी यांच्या लिपलॉक सीनमुळे बच्चन कुटुंबातील वातावरण तापलं होतं. एवढंच नाही तर, जया बच्चन, राणी हिच्या रागावल्या देखील होत्या असं देखील सांहण्यात आलं…

जेव्हा अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती, तेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनमुळे दोघांचं लग्न मोडलं… असं देखील सांगण्यात आलं… रिपोर्टनुसार, वडिलांसोबत राणीचं लिपलॉक सीन पाहिल्यानंतर अभिषेक संतापला होता आणि त्यानंतर अभिषेक आणि राणी मुखर्जी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

ब्लॅक सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत यशा कपूर, शेरनाझ पटेल आणि धृतिमान चॅटर्जी सहाय्यक भूमिकेत होत्या. सिनेमात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या लिपलॉक सीनमुळे तुफान चर्चेत आला होता. तेव्हा ‘ब्लॅक’ सिनेमाने जवळपास 66.6 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.