अमिताभ यांना किस केल्याने अभिनेत्रीचे अभिषेकशी लग्न मोडले, आज असती बच्चन कुटुंबाची सून

अभिषेक बच्चन आणि एका अभिनेत्रीच्या नात्याची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली होती. ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं . मात्र असं अचानक काय झालं की त्यांचं नात लग्नापर्यंत जाता जाता राहिलं.

अमिताभ यांना किस केल्याने अभिनेत्रीचे अभिषेकशी लग्न मोडले, आज असती बच्चन कुटुंबाची सून
Rani Mukherjee, Abhishek Bachchan Love
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2025 | 4:16 PM

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा होतच असतात. तसेच अनेक कपलचे नाते हे लग्नापर्यंत गेलं आहे तर अनेकांचे यशस्वी झाले नाहीत. असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्यांचे अफेअर्सच्या चर्चा आजही केल्या जातात. त्यातील एक जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी. बऱ्याच जणांना माहित आहे की बॉलिवूडमध्ये राणी मुखर्जी आणि अभिषेकच्या नात्याची चर्चा खूप काळ चर्चा सुरु होती.

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरु होत्या.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीच्या अभिनयाने अनेक हृदये जिंकली, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बच्चन कुटुंबाशी असलेलं तिचं नातं. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘कभी अलविदा ना कहना’ यांसारख्या सिनेमांमधून या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. त्याच दरम्यान, अभिषेक आणि करिश्मा कपूरचा साखरपुडाही मोडला होता आणि त्यानंतर राणी बच्चन कुटुंबाच्या आणखी जवळ आली होती.


बच्चन कुटुंबाची लाडकी होती राणी

बॉलिवूडमध्ये असंही बोललं जायचं की जया बच्चन राणीला खूप पसंत करत होत्या. दोघीही बंगाली कुटुंबातील आहेत. त्याशिवाय, अमिताभ बच्चन आणि राणीनेही अनेक सिनेमांमध्ये एकत्र कामही केलं होतं. ‘ब्लॅक’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बाबुल’, ‘बंटी और बबली’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांमधून अमिताभ बच्चन आणि राणी मुर्खर्जी या दोघांची जोडी झळकली होती.

पण अचानक असं काय झालं की राणी आणि बच्चन कुटुंब यांचं नातं दुरावलं? याला कारण होतं ते म्हणजे राणी आणि अमिताभ यांचा एक चित्रपट. ज्यामुळे अभिषेक आणि राणी यांचं नातं लग्नापर्यंत जाऊ शकलं नाही. तो सिनेमा होता ब्लॅक.

ब्लॅक सिनेमातील तो एक सीन

असं म्हटलं जातं की, ‘ब्लॅक’ सिनेमातील एक किसिंग सीन,जो राणी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर शूट केला होता. जया बच्चन या सीनच्या विरोधात होत्या. पण राणीने हा सीन करण्यास होकार दिला, आणि त्यानंतर बच्चन कुटुंब आणि तिच्यात अंतर निर्माण झालं. याशिवाय, राणीच्या पालकांनी अभिषेकसाठी बच्चन कुटुंबाशी लग्नाची चर्चा केली होती, पण म्हणतात की, जया बच्चन यांनी स्पष्टपणे हे नातं नाकारलं.अन्यथा आज राणी बच्चन कुटुंबाची सून असती असंही म्हटलं जातं.