राणी मुखर्जीच्या ‘या’ गोष्टीवर रोज संतापतो नवरा, म्हणाली, ‘लग्न झालंय तेव्हापासून…’

लग्न झाल्यानंतर राणी मुखर्जीवर रोज संतापायचा नवरा, अभिनेत्री म्हणाली, म्हणाली, 'लग्न झालंय तेव्हापासून...', अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे असते अधिक चर्चेत...

राणी मुखर्जीच्या या गोष्टीवर रोज संतापतो नवरा, म्हणाली, लग्न झालंय तेव्हापासून...
| Updated on: Oct 08, 2025 | 9:59 PM

अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आज राणी मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. दरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला की तिचा नवरा तिच्यावर संतापत असतो. तो क्वचितच कॅमेऱ्यासमोर येतो. राणी अनेकदा कॅमेऱ्यासमोर एकटी दिसते. आदित्य तिच्यासोबत कधीच दिसत नाही, मग ती दुर्गापूजेला असो किंवा इतर कुठेही.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचं 2014 मध्ये लग्न झाले. ते बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. आदित्य प्रसिद्धीपासून दूर राहतो आणि पापाराझी आणि मीडियाला टाळतो, परंतु राणीची स्पष्टवक्ती शैली सर्वांना आवडते. एका मुलाखतीत राणीने सांगितलं होतं की, तिचा नवरा तिच्यावर रोज संतापतो…

जुन्या मुलाखतीत राणी म्हणालेली, आदित्यला लाईमलाईटपासून दूर राहायला आवडतं. कारण तो निर्माता आहे आणि निर्माता म्हणून त्याला लोकांनी ओळखावं असं त्याला वाटतं… एका गोष्टीसाठी तो मला कायम दोषी ठरवत असतो… तुझ्यासोबत लग्न केल्यापासून माझे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत…’ असं राणी म्हणालेली.

राणी मुखर्जीने 11 वर्षांपूर्वी आदित्य चोप्रासोबत गुपचूप लग्न केलं होतं. तिने प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याशी लग्न केलं आहे हे कोणालाही माहिती नव्हतं, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आदित्या आणि राणी यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव अदिरा असं आहे.. राणी मुलीला देखील लाईमलाईटपासून दूर ठेवते.

आता राणी मुखर्जी 47 वर्षांची आहे आणि पती आदित्य चोप्रा तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठे आहेत. आदित्य चोप्रा यांचं वय 54 वर्ष आहे. आदित्य यांच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. राणी ही आदित्य चोप्रा यांची दुसरी पत्नी आहे.

अभिनेत्रीच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, राणी लवकरच “मर्दानी 3” मध्ये दिसणार आहे. अभिराज मीनावाला दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार आहेत. हा सिनेमा 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.