बायको आणि 6 महिन्यांच्या मुलीला सोडून अभिनेत्याने थाटला दुसरा संसार, आज पहिली पत्नी जगतेय असं आयुष्य
Actor Love Life: परक्या महिलेसाठी अभिनेत्याने बायको आणि सहा महिन्यांच्या मुलाली सोडलं, आता दुसऱ्या कुटुंबासोबत जगतोय रॉयल आयुश्य, पहिली पत्नी मात्र..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Actor Love Life: झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी पहिल्या पत्नीची साथ सोडली आणि दुसरा संसार थाटला. टीव्ही विश्वातील एका अभिनेत्याने देखील असंच काही केलं. पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीची साथ सोडून अभिनेत्याने दुसरा संसार थाटला. आज तो अभिनेता दुसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहे. पण पहिल्या पत्नीने मात्र मुलीची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता रोनित रॉय आहे.
रॉनित याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष निलम सिंग हिला डेट केल्यानंतर रॉनित याने 2003 मध्ये लग्न केलं. निलम हिच्यासोबत रॉनित याचं दुसरं लग्न आहे. रॉनित याचं पहिलं लग्न झोआना मुमताज नावाच्या एक महिलेसोबत झालं होतं. रॉनित आणि झोआना यांना एक मुलगी देखील आहे.
रोनित आणि झोआना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. काही वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला नाही. सहा वर्षांची मुलगी असताना रोनित याने पहिल्या पत्नीची साथ सोडली. त्यांच्या मुलीचं नाव ओना असं आहे. याबद्दल खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रोनित रॉय याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा एका मुलाखतीत केलेला. ‘ओना हिला माहिती आहे, मी तिचा बाप आहे… ती सहा महिन्यांची असताना आम्ही वेगळे झालो… फार कमी काळ मी तिच्यासोबत घालवला आहे. मी माझ्या लेकीसाबोत अनेक वर्ष मिस केले आहेत… मला ओनाची प्रचंड आठवण यायची… गेल्या दिवसांचा विचार केला तरी मला प्रचंड दुःख होतं… पण ती मोठी होत आहे तसं आमचं नातं आणखी घट्ट होत आहे… आमच्या नात्यात आता विश्वास आहे…’ असं अभिनेता म्हणालेला.
रोनित याच्या पहिल्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याची पहिली पत्नी लेक ओना हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. रोनित याची मुलगी आता 33 वर्षांची झाली आहे…
रोनित रॉय याचं दुसरं कुटुंब…
अभिनेत्याच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 2003 मध्ये निलम सिंह हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहेत. रोनित याच्या मुलगी नाव आडोर आणि मुलाचं नाव अगस्त्य आहे. अनेक ठिकाणी अभिनेत्याला कुटुंबासोबत स्पॉट केलं जातं.
