AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर अलाहाबादिया, समय रैना, एल्विश यादव.. युट्यूबर्स दर महिन्याला किती कमावतात?; आकडा वाचून व्हाल थक्क!

प्रसिद्ध युट्यूबर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स किती कमावत असतील, असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. युट्यूब आणि इतर माध्यमातून त्यांची महिन्याला लाखोंमध्ये कमाई होते. प्रसिद्ध युट्यूबर्स दर महिन्याला किती कमावतात, ते जाणून घेऊयात..

रणवीर अलाहाबादिया, समय रैना, एल्विश यादव.. युट्यूबर्स दर महिन्याला किती कमावतात?; आकडा वाचून व्हाल थक्क!
युट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्सImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2025 | 1:04 PM
Share

सध्या युट्यूबर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा जमाना आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यांची लोकप्रियता सेलिब्रिटींइतकीच आहे. किंबहुना काहीजण सेलिब्रिटींपेक्षाही अधिक लोकप्रिय आहेत. सध्या रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना हे युट्यूबर्स एका वादग्रस्त शोमुळे चर्चेत आले आहेत. रणवीरने या शोमध्ये एका स्पर्धकाला आई-वडिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह सवाल केला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाईची मागणी होतेय. या वादामुळे पुन्हा एकदा युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स चर्चेत आले आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांची लाखोंची कमाई होते. टॉप ५ युट्यूबर्स दर महिन्याला किती कमावतात, ते पाहुयात..

समय रैना- ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचा कर्ताधर्ता समय रैना त्याच्या कंटेंटच्या माध्यमातून दर महिन्याला जवळपास दीड कोटी रुपयांची कमाई करतो. समयची कमाई ही इतर युट्यूबर्सच्या तुलनेत जास्त आहे, कारण तो त्याच्या शोचे व्हिडीओ फक्त पेड ऑडियन्सलाच (पैसे भरणाऱ्या प्रेक्षकांना) दाखवतो. सध्याच्या घडीला पाच ते सहा लाख लोक महिन्याला 59 रुपयांचं सबस्क्रिप्शन विकत घेऊन समयचं कंटेट पाहत आहेत. याच कारणामुळे या शोद्वारे त्याची कोट्यवधी रुपयांमध्ये कमाई होत आहे. याशिवाय सोशल मीडियाद्वारे त्याला जवळपास 50 लाख रुपये मिळतात. अशा पद्धतीने समयची एका महिन्याची कमाई ही जवळपास दोन कोटींच्या घरात आहे.

रणवीर अलाहाबादिया- ‘बीअर बायसेप्स’ नावाने सोशल मीडिया पेज असलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याचे जवळपास सात युट्यूब चॅनल आहेत. या चॅनल्सद्वारे तो जवळपास 35 लाख रुपयांची कमाई करतो. याशिवाय रणवीरचा इतर व्यवसायसुद्धा आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. रणवीरची दर महिन्याची कमाई 50 लाख रुपयांपर्यंत आहे.

आशिष चंचलानी- इन्फ्लुएन्सर स्पेस वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आशिष चंचलानी त्याच्या युट्यूब चॅनद्वारे दर महिन्याला जवळपास 30 लाख रुपये कमावतो. याशिवाय अभिनयाचे प्रोजेक्ट्स, ब्रँड कोलॅबरेशन, सोशल मीडिया अकाऊंटवरून होणारी कमाई यातून महिन्याला ही रक्कम 70 ते 80 लाखांपर्यंत पोहोचते.

एल्विश यादव- बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवचे दोन युट्यूब चॅनल आहेत. आपल्या एका युट्यूब व्हिडीओतून तो जवळपास 4 ते 6 लाख रुपये कमावतो. याशिवाय ‘लाफ्टर शेफ 2’ या शोमधून एल्विशला दर आठवड्याला 1.2 लाख रुपयांची फी मिळत आहे. युट्यूब आणि टीव्हीसोबतच एल्विश त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ब्रँड कोलॅबरेशनसुद्धा करतो. म्हणजेच सर्वकाही मिळून एल्विशची दर महिन्याची कमाई 40 लाख रुपयांच्या घरात आहे.

कॅरी मिनाटी (अजय नागर)- इन्फ्लुएन्सर स्पेस या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कॅरी मिनाटी हा दर महिन्याला 16 लाख रुपये कमावततो. याशिवाय ब्रँडिंग आणि इन्स्टाग्रामवरील कंटेटद्वारे त्याची जवळपास 25 लाख रुपयांची कमाई होते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.