रणवीर शाैरी याने केले थेट अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीला किस, ‘ते’ पाहून यूट्यूबरने…
बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले काही दिवसांपूर्वीच झालाय. सना मकबूल ही बिग बॉसची विजेता झालीय. सर्वांनाच वाटत होते की, रणवीर शाैरी हे बिग बॉस ओटीटी 3 चे विजेता होतील. मात्र, तसे झाले नाहीये. अरमान मलिक हा बिग बॉसच्या घरात आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन पोहोचला.

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले झालाय. विशेष म्हणजे सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झालीये. सना बिग बॉसची विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बिग बॉसच्या घरात काही खास गेम खेळताना सना मकबूल ही दिसली नाही. रणवीर शाैरी हे बिग बॉस ओटीटी 3 चे विजेता होतील, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, विजयाची माळ सना मकबूल हिच्या गळ्यातच पडली. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉस ओटीटीमध्ये पोहोचला. मात्र, अरमानची पहिली पत्नी पायल ही काही दिवसांमध्येच घरातून बाहेर पडली. विशेष म्हणजे अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही चक्क टॉप 5 पर्यंत पोहोचली.
बऱ्याच लोकांना वाटत होते की, अरमान मलिक याची पत्नी कृतिका मलिक ही बिग बॉस जिंकेल. विशेष म्हणजे कृतिका मलिक ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसली. आता सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ हे फिनालेचे चांगेलच व्हायरल होताना दिसत आहेत, यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
कृतिका मलिक ही टॉप 5 मधून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत होती, त्याचे ते फोटो आणि व्हिडीओ आहेत. कृतिका मलिक ही बिग बॉसमधून बाहेर पडत असताना रणवीर शाैरी हे तिला भेटताना दिसत आहेत. यावेळी कृतिका मलिक ही गळाभेट घेताना दिसत आहे. मात्र, यावेळी रणवीर शाैरी हा कृतिका मलिकची किस घेताना दिसतोय.

यावेळी अरमान मलिक हा घराच्या बाहेर दिसतोय. मात्र, अरमान मलिक याला रणवीर शाैरी याने अशाप्रकारे कृतिकाचे किस घेणे आवडले नसल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. मात्र, रणवीर शाैरी हे अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींचे खूप चांगले मित्र असल्याने तो काहीच बोलू शकला नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
कृतिका मलिक हिच्याबद्दल अत्यंत चुकीची कमेंट विशाल पांडे याने केली होती. ज्यानंतर घरात मोठा हंगामा बघायला मिळाला. त्यावेळी विशाल पांडे याने चूक मान्य देखील केली होती. मात्र, त्यानंतर आपण काहीही चुकीचे बोलले नसल्याचे त्याने स्पष्ट केले. अरमान मलिक याने थेट विशाल पांडे याच्या कानाखाली रागात मारली होती.
