AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जीवनाचा उद्देश काय? रणवीर सिंहचा सदगुरूंना सवाल; इंडस्ट्रीतील बंदीदरम्यान क्लिप व्हायरल

अभिनेता रणवीर सिंहविरोधात बॉलिवूड इंडस्ट्रीत असहकाराचे निर्देश जारी झाल्यानंतर त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अध्यात्मिक गुरू सदगुरू यांना तो जीवनाचा उद्देश काय, असा प्रश्न विचारताना दिसत आहे.

या जीवनाचा उद्देश काय? रणवीर सिंहचा सदगुरूंना सवाल; इंडस्ट्रीतील बंदीदरम्यान क्लिप व्हायरल
Sadhguru and Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2026 | 2:15 PM
Share

अभिनेता रणवीर सिंह 2026 हे वर्ष सुरू झाल्यापासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. ‘धुरंधर 2’ने मिळवलेलं प्रचंड यश असो, ‘कांतारा’मधील देवीची नक्कल करणं असो आणि आता ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यानंतर रणवीरवर FWICE ने घातलेले बंदीचे आदेश असो.. सध्या सर्वत्र रणवीर सिंह हेच नाव तुफान चर्चेत आहे. सोमवारी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरविरोधात असहकाराचे आदेश जारी केले. या संपूर्ण वादादरम्यान आता रणवीरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर हा अध्यात्मिक गुरू सदगुरू यांना ‘जीवनाचा उद्देश काय’ हा प्रश्न विचारताना दिसत आहे.

रणवीरचा हा व्हिडीओ जुलै 2018 मधला असून ‘आयआयएम बेंगळुरू’च्या माजी विद्यार्थी नेतृत्व संमेलनात त्याने सदगुरूंशी संवाद साधला होता. सदगुरू यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंगळवारी रात्री रणवीरच्या मुलाखतीमधली एक क्लिप शेअर करण्यात आली. यामध्ये रणवीर सदगुरूंना सांगतो, “मी तुम्हाला भेटल्यानंतर काय प्रश्न विचारावा, यासंदर्भातील एक पोस्ट ट्विटरवर लिहिली होती. त्यावर 80 टक्के लोकांनी या जीवनाचा उद्देश काय, हाच प्रश्न विचारायला सांगितला.”

रणवीर आणि सदगुरू यांच्यातील संवाद

View this post on Instagram

A post shared by Sadhguru (@sadhguru)

रणवीरच्या या प्रश्नावर सदगुरू म्हणतात, “जेव्हा तुम्ही जीवनाचा उद्देश विचारता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही या आयुष्याचा उपयोग काय आहे, हेच विचारत असता. खरंतर या आयुष्याचा काहीच उपयोग नाही. जरी तुमचा जन्म झाला नसता, तरी सर्वकाही व्यवस्थितच असतं. माझ्यावर विश्वास ठेवा, उलट तेच उत्तम झालं असतं.” हे ऐकताच रणवीरसह उपस्थित प्रेक्षकसुद्धा जोरात हसू लागतात.

सदगुरू पुढे सांगतात, “आयुष्याचा काहीच उद्देश नाही. याचा उद्देश काय, त्याचा उद्देश काय, याचा उपयोग काय यांसारख्या निरर्थक, तार्किक हिशोबांच्या पलीकडचं आयुष्य म्हणजे केवळ एक घटना आहे. त्याचा कोणताही उपयोग नाही. फक्त एवढंच की आयुष्य तुमच्या बुद्धीपेक्षाही एक मोठी घटना आहे.” या क्लिपवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ही क्लिप शेअर करण्याची वेळ’, असं एकाने लिहित टाळ्या वाजवतानाचा इमोजी पोस्ट केला आहे. तर ‘मला रणवीर सिंहमध्ये 360 अंश बदल दिसतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. रणवीर पूर्णपणे बदलला आहे, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल