Ranveer Singh | विवाहित रणवीर सिंग याला आजही येतात ‘प्रेमपत्र’, नक्की काय आहे प्रकरण?

पत्नी दीपिका पादुकोण नाही तर, कोण पाठवतं रणवीर सिंग याला 'प्रेमपत्र', अभिनेता सध्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत...

Ranveer Singh | विवाहित रणवीर सिंग याला आजही येतात प्रेमपत्र, नक्की काय आहे प्रकरण?
| Updated on: Aug 08, 2023 | 2:05 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेता रणवीर सिंग कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. रणवीर फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. रणवीर याचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ २८ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात रणवीर याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर – आलिया स्टारर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात रणवीर याने साकारलेल्या ‘रॉकी’ या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर देखील ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे सिनेमातील कलाकार प्रचंड आनंदी आहेत. आनंद व्यक्त करण्यासाठी रणवीर याने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. रणवीर याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

एका चाहत्यांने अभिनेत्याला विचारलं, ‘आतापर्यंत तुला कोणती सर्वात जास्त कॉम्प्लिमेंट मिळाली आहे?’ चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘ज्या प्रकारे स्तुतीचा वर्षाव होत आहे ते पाहून मी भारावून गेलो आहे. मोठ-मोठी प्रेमपत्रे येत आहेत. मी सर्वांचा खूप आभारी आहे.’ सध्या सर्वत्र रणवीर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या प्रश्न – उत्तरांच्या खेळाची चर्चा रंगली आहे.

आक्स सेशनदरम्यान, अभिनेत्याला त्याच्या ‘धिंडोरा बाजे रे’ मधील कथक नृत्याबद्दल प्रश्न विचारण्याच आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘कथक नृत्याची तयारी करण्यासाठी मला जवळपास एक महिना लागला.. माझ्यासाठी थोडं कठीण होतं…’ असं देखील अभिनेता म्हणाला. ‘धिंडोरा बाजे रे’ गाण्यात रणवीर – आलिया यांनी कथक नृत्य केलं आहे.

‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात रणवीर – आलिया यांच्यासोबत शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे.

रिपोर्टनुसार, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमा यंदाच्या वर्षातील १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणारा सहावा हिंदी सिनेमा ठरला आहे. अशात सिनेमा येत्या दिवसांत किती कोटी रुपयांची मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.