AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Mandanna: वाढदिवशी रश्मिकाने चाहत्यांना दिली भेट; साकारणार काश्मिरी मुस्लीम तरुणीची भूमिका

'नॅशनल क्रश', 'एक्स्प्रेशन क्वीन' अशा विविध नावांनी ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) तिच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राइज भेट दिली आहे. रश्मिकाच्या आगामी चित्रपटातील तिचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Rashmika Mandanna: वाढदिवशी रश्मिकाने चाहत्यांना दिली भेट; साकारणार काश्मिरी मुस्लीम तरुणीची भूमिका
Rashmika Mandanna movieImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 05, 2022 | 4:35 PM
Share

‘नॅशनल क्रश’, ‘एक्स्प्रेशन क्वीन’ अशा विविध नावांनी ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) तिच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राइज भेट दिली आहे. रश्मिकाच्या आगामी चित्रपटातील तिचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रश्मिका एका काश्मिरी मुस्लीम तरुणीची (Kashmiri Muslim girl) भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलं नसून तात्पुरतं त्याला ‘प्रॉडक्शन नंबर 7’ असं म्हटलं जात आहे. स्वप्ना सिनेमा निर्मित या चित्रपटात दलकर सलमान (Dulquer Salmaan) मुख्य भूमिकेत आहे. हानु राघवापुडी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. यामध्ये दलकर सलमान हा ल्यूटनंट राम ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर अभिनेत्री मृणालिनी ठाकूर ही त्याची प्रेयसी सीता ही भूमिका साकारणार आहे.

स्वप्ना सिनेमा बॅनरअंतर्गत अश्विनी दत्त आणि प्रियांका दत्त या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रश्मिकाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत तिच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात यावा, असा निर्णय निर्मात्यांनी घेतला. रश्मिकाने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. यामध्ये ती आफ्रीन नामक काश्मिरी मुस्लीम तरुणीची भूमिका साकारतेय. तिच्या भूमिकेची झलक या व्हिडीओतून दाखवण्यात आली आहे. यामध्ये ती जळत्या कारसमोरून चालत येताना दिसतेय. तिने लाल हिजाब परिधान केला असून तिच्या हातात एक बॅग आहे.

रश्मिकाचा चित्रपटातील लूक-

हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटातील दलकर सलमान आणि मृणालिनी यांच्या भूमिकांची झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली होती. आता रश्मिकाच्या भूमिकेमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. या बिग बजेट चित्रपटाचं शूटिंग अंतिम टप्प्यावर पोहोचलं आहे.

हेही वाचा:

ट्विंकल खन्नाने The Kashmir Filesची उडवली खिल्ली; म्हणाली ‘आता मीसुद्धा..’

Halal Meat Row: ‘जर हलाल या शब्दाचा इतका त्रास होत असेल तर..’; हलाल मांसाच्या वादावर लकी अलींची पोस्ट चर्चेत

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....