
एका अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या शैलीबाहेर जाऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दक्षिण भारतीय आणि आता बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांचीही आवडती बनली आहे. सलग दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांसह, तिने गेल्या दोन वर्षांत 3 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तिच्या चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
ही अभिनेत्री फक्त 29 वर्षांची आहे, पण तिने अनेक टॉप अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे. सध्या तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. तिचा एक चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे आणि त्यासाठी तिने एका मोठ्या हॉरर-कॉमेडी यूनिवर्सशी हात मिळवणी केली आहे. या अभिनेत्रीने 2018 मध्ये तेलुगू भाषेत पदार्पण केले. पण 2021 साली तिच्यासाठी सर्व काही बदललं.
पुष्पाने बदललं नशीब
2021 साली जेव्हा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा श्रीवल्ली प्रसिद्ध झाली. रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर, तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडले. पण तिलं खरं यश तेव्हा मिालं जेव्हा ती 2023 साली आलेल्या “ॲनिमल” चित्रपटात रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटाने जगभरात 915 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
त्यानंतर ‘पुष्पा’चा सिक्वेल आला. अल्लू अर्जुन आणि श्रीवल्ली पुन्हा एकदा एकत्र आले. “पुष्पा: द रुल” डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो एक खळबळजनक चित्रपट ठरला. त्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. या चित्रपटाने विशेषतः जगभरात 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.
छावाच्या घोडदौडीचा फायदा
रश्मिका मंदानाचा प्रवास एवढ्यातच थांबला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला”छावा” प्रदर्शित झाला. तो चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती, पण मोठ्या पडद्यावर आणि बॉक्स ऑफीसवरही त्याने धूमाकळू माजवत मोठी कमाई केली. याची कोणीच कल्पना केली नव्हती. थोड्याच वेळात, त्याने जगभरात 8अब्ज रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटात रश्मिकाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका केली होती.
खरं तर, ‘पुष्पा 2’, ‘छावा’ आणि ‘अॅनिमल’ या चित्रपटांचे कलेक्शन एकत्र केले तर एकूण कलेक्शन 3500 कोटी होते. रश्मिका मंदान्नाच्या या तीन चित्रपटांनी एकत्रितपणे कमाई केली आहे. पण 2025 मध्ये तिला जितका ांद मिळाल, तेवढीच निराशा हाथी आली जेव्हा एका मोठ्या सुपरस्टारने तिच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची मालिका मोडली.
खरंतर, सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट या वर्षी ईदला प्रदर्शित झाला. तो मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पण हा चित्रपट बिलकूल चालला नाही, लोकांनी तो थेट नाकारला. सलमान खानचे लाखोंचे नुकसान झाले. पण रश्मिकाला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले. कारण तिची हिट चित्रपटांची मालिका यामुळे थांबली आणि फ्लॉपचा सामना करावा लागला.