AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांना लाज वाटली पाहिजे…’, मुलींच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत ‘असं’ काम करणाऱ्यांवर भडकल्या Ratna Pathak

Bollywood | बॉलिवूडमध्ये अनेक पुरुषांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत 'असं' काम करणाऱ्यांवर रत्ना पाठक स्पष्टच म्हणाल्या... रत्ना पाठक कायम बॉलिवूडच्या अनेक मुद्द्यांवर वक्तव्य करत असतात.

'त्यांना लाज वाटली पाहिजे...', मुलींच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत 'असं' काम करणाऱ्यांवर भडकल्या Ratna Pathak
| Updated on: Oct 13, 2023 | 9:04 AM
Share

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री रत्ना पाठक ( Ratna Pathak) बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही रत्ना पाठक कोणत्या न कोणेत्या कारणामुळे चर्चेत असतात. रत्ना पाठक त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रत्ना पाठक यांनी बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यांवर रत्ना पाठक यांनी निशाणा साधला आहे.

मुलाखतीत रत्ना पाठक यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘प्रेम रतन धन पायो सिनेमात ५० वर्षांच्या सलमान खान याने ३० वर्षीय अभिनेत्री सोनम कपूर हिच्यासोबत रोमान्स केला. ‘ओम शांती ओम’ सिनेमात ४२ वर्षीय शाहरुख खान याने २१ वर्षीय अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत रोमान्स केला.. यावर तुमचं मत काय…’

विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रत्ना पाठक म्हणाल्या, ‘जर त्यांना लाज वाटत नाही, तर मी काय बोलणार? स्वतःच्या मुलीपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करायला त्यांना लाज वाटत नाही, तर त्यांना मी काय बोलणार…त्यामुळे माझ्याकडे यावर बोलण्यासाठी काहीही नाही. ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे..’ सध्या रत्ना पाठक यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

सिनेमांमध्ये होणाऱ्या परिवर्तनावर रत्ना पाठक यांचं वक्तव्य

रत्ना पाठक म्हणाल्या, ‘मला ठाऊक आहे, समाज आणि सिनेमांमध्ये फार मोठे बदल झाले आहेत. आता महिली बुर्खा आणि पडद्यामागे नाही राहत. आज महिला आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम आहेत. आज महिला त्यांचा मार्ग निवडत आहेत. मी अनेकदा स्वप्नात बाईक चालवली आहे. मी बाईक चालवणाऱ्यांना पाहते, तेव्हा मला वाटतं मी देखील एकदा बाईक चालवावी…’ सध्या सर्वत्र रत्ना पाठक यांची चर्चा रंगत आहे.

रत्ना पाठक यांचा आगामी सिनेमा

रत्ना पाठक सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. रत्ना पाठक यांच्या आगामी सिनेमाचं नाव ‘धक धक’ असं आहे. सिनेमात रत्ना पाठक यांच्यासोबत अभिनेत्री सना शेख, दिया मिर्झा आणि संजना सांघी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू