AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

One Friday Night | प्रेमात रोमान्स, विश्वासघात… रवीना – मिलिंद यांच्या आयुष्याभोवती फिरणारा ‘वन फ्रायडे नाइट’

ड्रामा, रोमान्स, सस्पेन्स, रिलेशनशिप, सिक्रेट्स आणि जबरदस्त ट्विस्ट भोवती फिरणारा 'वन फ्रायडे नाइट'... 'जिओ सिनेमा'वर तुम्ही फ्रीमध्ये पाहून शकता सिनेमा...

One Friday Night | प्रेमात रोमान्स, विश्वासघात... रवीना - मिलिंद यांच्या आयुष्याभोवती फिरणारा 'वन फ्रायडे नाइट'
| Updated on: Jul 29, 2023 | 9:45 AM
Share

मुंबई | 29 जुलै 2023 : ‘ऐसे आदमी के साथ नही रुकती जो मुझसे नही किसी और से प्यार करता है…’ अभिनेत्री रवीना टंडन, अभिनेता मिलिंद सोमण आणि विधी चितालिया यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. सध्या सर्वत्र ‘वन फ्रायडे नाइट’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘वन फ्रायडे नाइट’ सिनेमाचं दिग्दर्शन मनीष गुप्ता यांनी केलं आहे. सिनेमा २८ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. जीओ सिनेमावर तुम्हाला रवीना टंडन आणि मिलिंद सोमण यांची केमेस्ट्री पाहता येणार आहे. सध्या सर्वत्र रवीना हिच्या नव्या सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात तुम्हाला भरपूर ड्रामा, रोमान्स, सस्पेन्स, रिलेशनशिप, सिक्रेट्स आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा राम या श्रीमंत माणसाच्या भोवती फिरताना दिसत आहे. स्वतःपेक्षा अर्ध्या वयाच्या स्त्रीच्या महिलेल्या स्वतःच्या प्रेमात अडकवतो. सिनेमातील एका डायलॉगमुळे कळत आहेत की सिनेमाची कथा नक्की कशी आहे. ‘ऐसे आदमी के साथ नही रुकती जो मुझसे नही किसी और से प्यार करता है…’ सिनेमातील ट्विस्ट तुम्हाला फ्रिमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ सिनेमावर पाहता येणार आहे.

रवीना आणि मिलिंद यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, मिलिंद सोमण अॅक्शन-थ्रिलर ‘लकडबाघा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. एवढंच नाही तर, मिलिंद लवकरच अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमात देखील दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. मिलिंद सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.

रवीना हिने देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री KGF Chapter 2′ मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली होती. हा सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आगामी रोमँटिक कॉमेडी सिनेमा ‘घुडछडी’मध्ये रवीना अभिनेता संजय दत्तसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रवीना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी सिनेमांची माहिती देत असते. सोशल मीडियावर रवीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत