जखमी पाय, ताप अन् पीरियड्सच्या वेदना; अशा परिस्थितीतही रवीनाने पावसात शूट केलं हे सुपरहीट गाणं

बॉलिवूडमधील 70s, 80s ची अशी अनेक गाणी आहेत जी आजही तेवढीच हीट आहे. त्यातीलच एक गाणं रवीनाचंही आहे. पण त्या गाण्यावेळी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पायाला जखमा झाल्या होत्या, पीरियड्सच्या वेदना जाणवत होत्या तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिला रुग्णालयात घेऊन जावं लागलं.  तिने स्वत: हा किस्सा सांगितला आहे. कोणतं होतं हे गाणं माहितीये?  

जखमी पाय, ताप अन् पीरियड्सच्या वेदना; अशा परिस्थितीतही रवीनाने पावसात शूट केलं हे सुपरहीट गाणं
Raveena Tandon had fever, menstrual pain while shooting the song Tip Tip Barsa Paani
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2025 | 1:50 PM

बॉलिवूडमधील अशी अनेक गाणी आहेत जे पावसात शूट करण्यात आलेली आहेत तसेच ती सुपरहीट ठरलेली आहेत. पण सर्वात जास्त हीट ठरलेलं गाणं म्हणजे रवीना टंडन आणि अक्षय कुमारवर चित्रित झालेलं ‘टिप टिप बरसा पानी’. हे एक आयकॉनिक गाणं असून ज्याची क्रेझ आजही कमी झालेली नाही. जरी पण हे गाणं शूट करताना रवीनाला मात्र खूप त्रास सहन करावा लागला होता. तिची अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती. अखेर तिला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं होतं.

रवीना टंडनने गाण्याच्या शूटिंगशी संबंधित एक किस्सा शेअर केला

रवीना टंडनने ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या रिअॅलिटी शोमध्ये या गाण्याच्या शूटिंगशी संबंधित एक किस्सा शेअर केला. यावेळी तिने सांगितले की, ‘टिप टिप बरसा’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. रवीनाच्या म्हणण्यानुसार, हे गाणे एका कंस्ट्रक्शन साइटवर हे चित्रित करण्यात आलं होतं. ज्यामुळे तिच्या पायांना दुखापत झाली होती. इतकेच नाही तर या काळात तिला मासिक पाळी देखील होती. ज्यामुळे तिला खूप पोटात दुखत होतं. एवढंच नाही तर पावसात भिजल्यामुळे तिला तापही आला होता.

शुटींग करताना धनुर्वाताचे इंजेक्शन घ्यावे लागले

त्या दिवसांची आठवण करून देताना रवीना म्हणाली, ‘हे गाणे एका कंस्ट्रक्शन साइटवर चित्रित केले जात होते. मी अनवाणी पायांनी शूटींग करत होते आणि तिथे बरेच खिळे पडले होते. त्या खिळ्यांनी माझ्या पायाला जखमा झाल्या होत्या. या गाण्याच्या शुटींग करताना मला धनुर्वाताचे इंजेक्शन घ्यावे लागले. इतकेच नाही तर हे गाणे पावसात चित्रित केले जात होते, ज्यामुळे मला खूप ताप आला आणि मी आजारी पडले होते.पीरियड्समुळे माझ्या पोटातही खूप दुखत होते.’

ग्लॅमरमागील वास्तव काही वेगळेच असतं 

या गाण्याबद्दल पुढे बोलताना रवीना म्हणाली ‘पडद्यावर दिसणाऱ्या ग्लॅमरमागील वास्तव काही वेगळेच असतं. आणि बऱ्याचदा असं होतं. अनेक सेलिब्रिटींच्याबाबत असं झालं असेल. रिहर्सल दरम्यान अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वेळा दुखापत होते, पण तरीही आपले काम करत राहावे लागते. वेदना होत असतानाही आपल्याला हसतमुखाने काम करावे लागते.’ असं म्हणत तिने हा किस्सा सांगितला.

मोहरामधील हे गाणे आजही तेवढेच हीट आहे

‘टिप टिप बरसा पानी’ हे 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘मोहरा’ मधील एक गाणे आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि नसीरुद्दीन शाह सारखे कलाकार दिसले होते. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे प्रचंड हिट झाले होते आणि आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.