महाकुंभमध्ये मुलांनी बनवला कतरिनाचा स्नान करतानाचा असा व्हिडीओ; भडकली रवीना

अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथे पार पडलेल्या महाकुंभमध्ये पोहोचली होती. यावेळी संगममध्ये तिने पवित्र स्नान केलं. सासूसोबत कतरिना संगममध्ये पवित्र स्नान करताना अनेकांनी व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्यावरून आता रवीना संतापली आहे,

महाकुंभमध्ये मुलांनी बनवला कतरिनाचा स्नान करतानाचा असा व्हिडीओ; भडकली रवीना
Raveena Tandon and Katrina Kaif
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2025 | 4:14 PM

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कतरिना कैफ उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये पार पडलेल्या महाकुंभमध्ये पोहोचली. सासूसोबत कतरिनाने त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान केलं. महाकुंभमधील कतरिनाने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये काही पुरुष कतरिनाच्या परवानगीशिवाय तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आता अभिनेत्री रवीना टंडनने राग व्यक्त केला आहे. हे कृत्य अत्यंत घृणास्पद असल्याची टीका रवीनाने केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन पुरुष स्वत:चा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. त्यानंतर ते कॅमेरा कतरिनाकडे वळवतात. या पुरुषांच्या मागेच कतरिना संगममध्ये स्नान करत असते. तिच्याकडे कॅमेरा फिरवून एक जण म्हणतो, “हा मी आहे, हा माझा भाऊ आहे आणि ही कतरिना कैफ आहे.” हे ऐकताच त्याच्या आजूबाजूचे लोक हसू लागतात. काहींना हा व्हिडीओ हास्यास्पद वाटला तरी अनेकांनी त्यावरून टीका केली आहे. महाकुंभसारख्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीचं वागणं पाहून नेटकऱ्यांनी संबंधितांना सुनावलं आहे.

रवीना टंडननेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे अत्यंत घृणास्पद आहे. अशा प्रकारचे लोक शांत आणि अर्थपूर्ण मानल्या जाणाऱ्या क्षणाला खराब करतात’, असं तिने लिहिलं. इतरांनीही त्यावर टीका केली आहे. ‘अत्यंत वाईट… हे अनेक अर्थांनी अनादर करणारं आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे अत्यंत लज्जास्पद आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान करण्यापूर्वी कतरिना आणि तिच्या सासूने तिथल्या साधूसंतांचं दर्शन घेतलं होतं. यावेळी कतरिनावर पुष्पवृष्टी करून आणि तिच्या गळ्यात माळ घालून तिचं स्वागत करण्यात आलं होतं. महाकुंभमधील साधूंनीही कतरिनाशी संवाद साधला होतता. कतरिना विकीच्या कुटुंबीयांसोबत अनेकदा धार्मिक स्थळांना भेट देत असते. काही दिवसांपूर्वीच ती आणि तिची सासू शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. कतरिनाच्या आधी तिचा पती आणि अभिनेता विकी कौशलसुद्धा महाकुंभला गेला होता. ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकीने संगममध्ये पवित्रस्नान केलं होतं.