AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवीना टंडन हिने पार्टीत सवतीवर फेकला काचेचा ग्लॉस, सर्वांसमोर घातला राडा आणि बरंच काही…

Raveena Tandon : सवतीला समोर पाहाताच भडकली रवीना टंडन, अभिनेत्रीने सवतीवर फेकला ग्लॉस, सर्वांसमोर पतीवरुन भांडणं... फार कमी लोकांना माहितीये रवीनाचं वैवाहिक आयुष्य.. विवाहित पुरुषासोबत रवीना टंडन अडकली विवाहबंधनात...

रवीना टंडन हिने पार्टीत सवतीवर फेकला काचेचा ग्लॉस, सर्वांसमोर घातला राडा आणि बरंच काही...
| Updated on: Jan 30, 2024 | 1:48 PM
Share

मुंबई | 30 जानेवारी 2024 : अभिनेत्री रवीना टंडन कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. रवीना टंडन हिचं लग्न प्रसिद्ध उद्योजक अनिल थडानी यांच्यासोबत झालं. रवीना हिच्यासोबत अनिल थडानी यांचं दुसरं लग्न आहे. 22 फेब्रुवारी 2004 मध्ये अनिल – रवीना यांनी सिंधी पद्धतीत मोठ्या थाटात लग्न केलं. आज रवीना सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण रवीना अनिल यांची दुसरी पत्नी आहे. अनिल थडानी यांचं पहिलं लग्न नताशा सिप्पी यांच्यासोबत झालं होतं. अनिल आणि नताशा यांना देखील दोन मुलं आहेत.

नताशा यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता, रितेश सिधवानी यांच्या पार्टीमध्ये नताशा त्यांच्या मित्रांसोबत पोहोचल्या होत्या. त्या पार्टीमध्ये रवीना देखील होती. रिपोर्टनुसार, सवतीला पाहिल्यानंतर रवीना संतापली आणि नताशा हिच्यावर काचेचा ग्लास फेकला..

पार्टीमध्ये सर्वांसमोर सवतीला पाहिल्यानंतर रवीना हिने राडा घातला. भांडणामध्ये नताशा यांच्या बोटातून रक्त येऊ लागलं होतं.. घडलेल्या घटनेबद्दल रवीना हिला देखील एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. तेव्हा सवतीबद्दल रवीना हिने धक्कादायक खुलासा केला होता..

रवीना म्हणाली, ‘देव आणि माझ्या वडिलांनंतर माझे पती अनिल थडानी उत्तम व्यक्ती आहेत. जर कोणी सर्वांसमोर अनिल यांचा अपमान करत असेल आणि मी त्याठिकाणी उभी असेल, तर मी एक शब्द देखील ऐकून घेणार नाही… कोणीही माझ्या कुटुंबाला काहीही बोलू शकत नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रवीना आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

रवीना हिला देखील दोन मुलं आहे. 2004 मध्ये लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीने 2005 मध्ये मुलगी राशा थडानी हिला जन्म दिला. त्यानंतर 2008 मध्ये अभिनेत्रीने मुलगा रणबीरवर्धन याला जन्म दिला. रवीना हिची मुलगी राशा अभिनेत्री नसली तरी लोकप्रिय आहे. रवीना कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगील आहे. राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर राशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.