भूमिकेसाठी जिवापाड मेहनत, ‘विजेता’बनण्यासाठी रिअल लाईफ खेळाडूंनी दिले रिल लाईफ हिरोंना दिले धडे

| Updated on: Dec 13, 2021 | 7:18 AM

अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता गौरीश शिपुरकर, आता ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

भूमिकेसाठी जिवापाड मेहनत, ‘विजेता’बनण्यासाठी रिअल लाईफ खेळाडूंनी दिले रिल लाईफ हिरोंना दिले धडे
vijeta
Follow us on

मुंबई : अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता गौरीश शिपुरकर, आता ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. अभिनेता गौरीश शिपुरकरने

नियम लक्षात ठेवून त्याप्रमाणे खेळणे अवघड
“मी विजेता सिनेमात शॉटपुट खेळाडूची भूमिका साकारत आहे. शॉटपुट हा खेळ खूप सोप्पा वाटतो. पण तुम्ही हा खेळ जेव्हा प्रत्यक्षात खेळता. तेव्हा त्यात किती मेहनत करावी लागते हे या सिनेमामुळे कळलं. प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते नियम लक्षात ठेवून त्याप्रमाणे खेळायचं, तितकाच सराव आणि व्यायाम करावा लागतो. त्यामुळे हे फार अवघड आहे. शॉटपुट या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करणारा शुभम यादव आणि ललित सावंत यांनी मला या भूमिकेसाठी मोलाची साथ दिली. आम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंनी संपूर्ण ट्रेन केलं. आम्ही सेटवर त्यांच्याकडून खेळाविषयी आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाविषयी जाणून घेतलं. तसेच माझ्यासाठी ही भूमिका फार चॅलेजींग होती.” अशी माहीती गौरीश शिपुरकरने दिली.

काय आहे चित्रपटाची कथा?
खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात मागील नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नसल्यामुळे, महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. महाराष्ट्राला जिंकवून देणं हे सौमित्रचं ध्येय असतं. तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो. त्या सर्वांमधील हरवलेला आत्मविश्वास परत आणतो, त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो, हे सर्व ‘विजेता’मध्ये अनुभवू शकाल.

संबंंधीत बातम्या

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो, चाहतेही झाले भावूक

Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!