शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रेखा यांच्या घरावर आयकर विभागाचा मोठा छापा; त्यानंतर जे घडलं..

| Updated on: Apr 23, 2024 | 3:51 PM

अभिनेते शेखर सुमन यांनी 'उत्सव' या चित्रपटात रेखा यांच्यासोबत काम केलं होतं. हा अनुभव कसा होता, याविषयी ते नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाले. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रेखा यांच्या घरावर आयकर विभागाने मोठा छापा टाकला होता.

शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रेखा यांच्या घरावर आयकर विभागाचा मोठा छापा; त्यानंतर जे घडलं..
Shekhar Suman and Rekha
Image Credit source: Instagram
Follow us on

पाटणाहून मुंबईला आल्यानंतर दोन आठवड्यांतच अभिनेते शेखर सुमन यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री रेखा यांच्यासोबत काम केलं होतं. ‘उत्सव’ असं या चित्रपटाचं नाव होतं आणि त्यात दोघांचे बरेच इंटिमेट सीन्स होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी रेखा यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. “चित्रपटात बरेच इंटिमेट सीन्स असतानाही रेखा यांनी त्याबद्दल अजिबात कोणती तक्रार केली नव्हती. इतकंच नव्हे तर शूटिंगदरम्यान त्यांच्या घरी आयकर विभागाचा छापा पडला असतानाही त्यांनी सेटवर थांबून शूटिंग पूर्ण करण्याचं ठरवलं होतं,” असं शेखर यांनी सांगितलं.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शेखर म्हणाले, “भारतीय चित्रपटसृष्टीतील एखाद्या नवोदित कलाकाराला मिळालेली ही सर्वांत मोठी ऑफर होती. अवघ्या पंधरा दिवसांत मी चित्रपटासाठी साइन केला होता. पाटणाहून आल्यानंतर मी माझा सूटकेससुद्धा पूर्णपणे उघडला नव्हता. पुढच्या दोन महिन्यांत मी चित्रपटाच्या सेटवर रेखा यांच्यासोबत शूटिंह करत होतो. या संधीसाठी मी शशी कपूर, गिरीश कर्नाड आणि रेखा यांचा सदैव ऋणी असेन.”

रेखा यांच्याविषयी ते पुढे म्हणाले, “मी त्यांच्यापेक्षा प्रोफेशनल अभिनेत्रीला आजवर भेटलो नाही. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या घरावर आयकर विभागाने मोठा छापा टाकला होता. त्यांच्याजागी कोणताही कलाकार असता तरी त्याने बॅग घेऊन सेटवरून काढता पाय घेतला असता. पण रेखा म्हणाला, त्यांना त्यांचं काम करू द्या, मी इथे थांबून माझं काम करेन. मला सुरुवातीला भीती वाटत होती की रेखा चित्रपट सोडून जातील आणि माझी पहिलीच संधी अशी वाया जाईल. पण रेखा शूटिंगरदम्यान कधीच कोणती तक्रार करायच्या नाहीत. इंटिमेट सीन्सदरम्यानही त्यांनी कोणता आक्षेप घेतला नव्हता.”

हे सुद्धा वाचा

‘उत्सव’ या चित्रपटानंतरही करिअरमध्ये फारसं यश मिळालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. “मी त्यानंतर बरेच चित्रपट केले. मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत काम केलं. पण एका वेळेनंतर चांगल्या भूमिका मिळतच नव्हत्या. त्यामुळे मी माघार घ्यायचं ठरवलं. पण नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. जे मिळालं नाही त्याची तक्रार करण्यापेक्षी मी जे मिळवलंय त्यावर लक्ष केंद्रीत करतो. पाटणामधील एखादा सर्वसामान्य मुलगा इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची कल्पनाच करू शकला नसता”, अशा शब्दांत शेखर सुमन यांनी भावना व्यक्त केल्या.