जेव्हा 70 वर्षांच्या रेखा यांनी 19 वर्षांच्या अभिनेत्याच्या ओठांवर केलं किस… अन् नंतर केली त्याच्याच आईची भूमिका

रेखा त्यांच्या वैयक्तीक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता जो की खूप चर्चेचा विषय ठरला होता. रेखा यांनी त्यांच्यापेक्षा 19 वर्षांन लहान अभिनेत्याला ओठांवर किस केल्याचा फोटो व्हायरल झाला होता. काय आहे या फोटो मागचं रहस्य जाणून घेऊयात.

जेव्हा 70 वर्षांच्या रेखा यांनी 19 वर्षांच्या अभिनेत्याच्या ओठांवर केलं किस... अन् नंतर केली त्याच्याच आईची भूमिका
rekha
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2025 | 2:06 PM

1970 च्या दशकात बॉलिवूडमध्ये ज्यांनी आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एवढंच नाही तर आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले अशी अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा आजही सौंदर्याच्या अन् अदाकारीच्या बाबतीत लोकांच्या मनावर राज्य करतात. पण रेखा त्यांच्या वैयक्तीक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिल्या आहेत. आणि आजही असतात. त्यांच्याबाबतचे काहीना काही किस्से व्हायरल होतच असतात.

19 वर्षांनी लहान अभिनेत्याला ओठांवर किस 

रेखा यांच्याबाबतचा असाच एक किस्सा व्हायरल झाला होता. तो म्हणजे त्यांनी त्यांच्यापेक्षी 19 वर्षांनी लहान अभिनेत्याला ओठांवर किस केलं होतं. त्यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता आणि चर्चेतही आला होता.

जेव्हा रेखा यांनी निर्मात्याच्या मुलाला किस केले

रेखा त्यांच्या चित्रपटांच्या निवडीमुळे, काही बोल्ड सीन्स आणि दमदार अभिनयामुळे चर्चेत राहिल्या आहेत. एका अवॉर्ड शोमध्ये रेखा सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या जिथे त्यांची भेट अभिनेता हृतिक रोशनशी झाली. रेखा यांनी हृतिकला प्रेमाने मिठी मारली आणि स्टार किडच्या गालावर चुंबन घेण्याचा विचार केला.

फोटोग्राफरने ज्या अँगलने फोटो घेतला….

पण चुकून ती किस ओठांजवळ घेतल्या गेली. तर काही जण म्हणतात की फोटोग्राफरने ज्या अँगलने फोटो घेतला त्या अँगलने फोटोत ती ओठांवरील किस वाटत आहे. पण त्यावेळी हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्याची खूप चर्चाही झाली.

रेखा आणि हृतिकने कोई मिल गयासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटात रेखा यांनी हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती, तर क्रिशमध्ये त्यांनी हृतिकच्या आजीची भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरले होते. त्यामुळे त्यावेळी फोटोची तेवढी चर्चाही खूप झाली होती.

रेखा शेवटच्या कोणत्या चित्रपटात दिसल्या होत्या?

जर रेखा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या शेवटची 2014 मध्ये आलेल्या ‘सुपर नानी’ चित्रपटात दिसली होत्या. पण त्या अनेक रिआलिटी शोमध्ये वैगरे दिसत असतात. पुन्हा एकदा त्यांना चित्रपटात नव्या भूमिकेत पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे.