
बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांची जवळची मैत्रीण आणि फॅशन डिझायनर बीना रमानी यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिलेशनशिप आणि उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत रेखा यांच्या लग्नाबद्दल बीना यांनी कोणाला माहिती नसलेलं सत्य सांगितलं आहे… बीना यांनी सांगितल्यानुसार, रेखा, अमिताभ बच्चन यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या… पण दोघांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दरम्यान, अशी वेळ आली, जेव्हा बिग बी यांनी रेखा यांच्यासोबत असलेलं नातं सर्वांसमोर मान्य करण्यात नकार दिला…
अमिताभ बच्चन यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी रेखा यांच्यासोबत असलेलं नातं स्वीकारण्यास नकार दिला… बीना यांनी सांगितल्यानुसार, त्याकाळात रेखा न्यूयॉर्कमध्ये आल्या होत्या आणि लग्ना करण्याची त्यांनी तयारी केली होती… एका मित्राच्या माध्यमातून रेखा आणि मुकेश अग्रवाल यांची ओळख झाली दिल्ली दोघांची भेट झाली. मुकेश हे रेखाचे फार मोठे चाहते होते आणि अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वकाही माहिती होतं…
भेटीनंतर मुकेश आणि रेखा यांच्यामध्ये संवाद सुरु झाला आणि दोघांमध्ये चांगलं नातं निर्माण झालं… रुप – रंगाना रेखा यांना मुकेश आवडत नव्हते… बिग बी यांच्यासारखा दिसणारा जोडीदार रेखा यांना हवा होता. पण मुकेश उंची कमी आणि सावळे होते… पण तेव्हा रेखा यांना एका खास व्यक्तीची आणि प्रेमाची गरज होती…
मुकेश आणि रेखा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी लग्न केलं. ज्याला बीना यांना देखील मोठा धक्का बसला… पण लग्नानंतर देखील दोघे वेगळे राहत होते. दिल्ली येथील वातावरणात रेखा रमल्या नाही… अखेर त्या पुन्हा मुंबईत आल्या.. याच कारणामुळे दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली… अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला…
रेखा आणि मुकेश यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज देखील दाखल केला. पण त्याआधीच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली… लग्नाच्या 7 महिन्यांनंतर मुकेश यांनी अखेरचा श्वास घेतं. याला जबाबदार रेखा आहेत… असे आरोप मुकेश यांच्या आईने केले… त्यानंतर सिनी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल सर्वकाही सांगितलं होतं.. आजही रेखा यांचं खासगी आयुष्य चर्चेत असतं.