
झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अभिनेत्रींचे कपडे, त्यांचा मेकअप, महागड्या गाड्या कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण समोर दिसतं तसं काहीही नसतं… खासगी आयुष्यात अभिनेत्री अनेक संकटांचा सामना करत असतात. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री रिंकू करमरकर हिच्या आयुष्यात देखील अनेक समस्या आल्या होत्या. 2002 मध्ये अभिनेत्री रिंकू हिने अभिनेता किरण करमकर याच्यासोबत लग्न केलं. सांगायचं झालं तर, ‘कहानी घर घर की’ मालिकेत दोघे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसले…
किरण करमकर याच्यासोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीच्या मुलाचं नाव ईशान असं आहे. मुलाच्या जन्माच्या काही वर्षांनंतर मात्र दोघांमध्ये वाद होऊ लागले. अखेर वाद टोकाला गेले आणि 2019 मध्ये रिंकू – किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रिंकू हिने तुटलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘पतीपासून विभक्त झाल्यानंतर माझी वाईट वेळ सुरु झाली. माझ्याकडे दीड वर्ष काहीच काम नव्हत. एक वेळ अशी होती माझ्याकडे सर्वकाही होतं. पण घटस्फोटानंतर माझ्याकडे 10 रुपये देखील नव्हते. मी लोकांकडून काम मागत होती. कारण माझ्या खांद्यावर मुलगा आणि आई – वडिलांची जबाबदारी होती. मी कायम म्हणायचे जे दिवस माझ्यावर आले आहेत, ते दुसऱ्या कोणावर देखील नको. पण तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे, तेच होतं.. ते कोणीच बदलू शकत नाही…’
‘मी गुरुजींना हात दाखवले. ते मला म्हणाले, तुझे आणखी वाईट दिवस येतील… मला वाटलं यापेक्षा वाईट काय असू शकतं. ते मला म्हणाले, तुझं कमबॅक होईल. पण त्याआधी कठिण परिस्थितीचा सामना करावा लागेल. 2 – 3 वर्ष मला एक – एक रुपयाची किंमत कळत होती. फोन रिचार्ज करण्यासाठी देखील माझ्याकडे पैसै नव्हते. पण माझ्या आयुष्यात मी जे काही निर्णय घेतले, त्यावर मला गर्व आहे आणि कुटुंबाला माझ्यावर…’ असं म्हणत अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या.
रिंकू धवन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘पहचान’, ‘छोटी सरदारनी’, ‘गुप्ता ब्रदर्स’, आणि ‘कहानी घर घर की’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. रिंकू हिला चाहते तिने साकारलेल्या भूमिकांमुळे ओळखतात.