ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया खरंच सावत्र भाऊ-बहिण? बॉलिवूडमध्ये झालेल्या चर्चा अन् त्यामागील सत्य

ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण एका चित्रपटानंतर त्यांच्या अफेरच्या चर्चा सुरु झाल्या. आणि या चर्चेसोबत अजून एक चर्चा जोर धरू लागली ती म्हणजे हे दोघेजण 'सावत्र भाऊ-बहिण' असण्याची.या अफवेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवली होती. कारण राज कपूर यांचा त्यांच्या कथित प्रेमसंबंधांना विरोध होता. यामागील सत्य नेमकं काय आहे? जाणून घेऊयात.

ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया खरंच सावत्र भाऊ-बहिण? बॉलिवूडमध्ये झालेल्या चर्चा अन् त्यामागील सत्य
Rishi Kapoor & Dimple Kapadia, Step-Siblings Uncovering Bollywood Biggest Rumor
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2025 | 3:12 PM

बॉलिवूडमध्ये असे अनेक घराणे आहेत ज्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चा होताना दिसते. त्यापैकी एक जोडी म्हणजे डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर. होय दोघांनी चित्रपटात कामही केलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर हे बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी 1973 मध्ये आलेल्या बॉबी चित्रपटात एकत्र काम केलं होतं, या चित्रपटाला समीक्षकांनी खूप प्रसंशाही मिळाली होती.

ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया एकमेकांचे सावत्र भाऊ-बहिण?

मात्र या चित्रपटानंचर या दोन्ही सेलिब्रिटींची नावे जोडली जाऊ लागली. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. मात्र तेव्हा डिंपल या आधीच राजेश खन्ना यांच्याशी विवाहित होत्या. पण तरी देखील त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. ऋषी कपूरचे वडील राज कपूर, ज्यांनी डिंपलला चित्रपटात ब्रेक दिला होता, ते मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाच्या तीव्र विरोधात होते. राज कपूरने त्यांच्या नात्याला विरोध केल्यामुळे अनेक अफवा पसरल्या गेल्या ज्यात डिंपल त्यांची मुलगी असल्याचा दावाही केला जात होता. असं बोललं जातं की ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया एकमेकांचे सावत्र भाऊ-बहिण आहे.

अखेर या अभिनेत्रीने सांगितले होते सत्य 

दरम्यान या बद्दल बॉलिवूडमध्येही बरीच चर्चा रंगू लागली होती. अखेर याबाबत नर्गिसने प्रतिक्रिया दिली. एका वृत्तानुसार, डिंपल कपाडिया ही ऋषी कपूरची सावत्र बहीण आणि राज कपूर तसेच नर्गिस (दत्त) यांची मुलगी असल्याची अफवा पसरली होती. राज कपूर आणि नर्गिस यांचे दीर्घकाळचे नाते होते हे सर्वांना माहित होते. परंतु त्यांनी कधीही लग्न केले नाही. डिंपल कपाडियाबद्दलच्या अशा अफवा अनेक वर्षे कायम राहिल्या, परंतु नंतर स्वतः नर्गिसने त्या नाकारत आणि त्याला निराधार म्हणत त्यावर पडदा टाकला होता. बॉबीनंतर, डिंपल आणि ऋषी यांनी 1985 च्या सागर चित्रपटात एक रोमँटिक सीन देखील केला होता.

डिंपलने राजेश खन्नाशी लग्न केले

डिंपलने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 27 मार्च 1973 रोजी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या वयाच्या फरकामुळे त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. लग्नाच्या वेळी डिंपल फक्त 15 वर्षांच्या होत्या, तर राजेश खन्ना 30 वर्षांचे होते म्हणजे दोघांमध्ये तब्बल 15 वर्षांचा फरक होता. त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली होत्या. तथापि, ती त्यांच्या लग्नावर नाखूष होत्या. त्यांना बॉलिवू़डमध्ये काम करायचं होतं. पण राजेश खन्ना यांना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी 1982 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला.