AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्राचे खास कनेक्शन, आयुष्यभर राहिली अविवाहित, एकाच कारणामुळे सतत चिडायची, 62 व्या वर्षी अखेरचा श्वास

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींचीनावे जोडण्यात आलीत, पण या अभिनेत्रीचा किस्सा थोडो वेगळा आहे. बच्चन कुटुंबाशी संबंधीत एकाच गोष्टीचा अभिनेत्रीला प्रचंड राग यायचा... आयुष्यभर राहिली अविवाहित अखेर वायाच्या 62 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला... जाणून घ्या कोण आहे 'ती' अभिनेत्री?

अभिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्राचे खास कनेक्शन, आयुष्यभर राहिली अविवाहित, एकाच कारणामुळे सतत चिडायची, 62 व्या वर्षी अखेरचा श्वास
Rita Bhaduri
| Updated on: Jul 16, 2026 | 10:15 AM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांचं नाव बच्चन कुटुंबासोबत जोडण्यात आलं. ज्याचा त्यांना मोठा फायदा देखील झाला. पण 70 च्या दशकात अशी अभिनेत्री होऊन गेली, जिला बच्चन कुटुंबियांचा भाग म्हटल्यानंतर प्रचंड राग यायचा. इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांची मेहुणी बोलण्यास सुरुवात केलेली. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड संतापायची. तिने आयुष्यात लग्न न करता एकटीच राहण्याचा निर्णय घेतला आणि वायाच्या 62 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रीटा भादुरी आहेत.

आडनावामुळे निर्माण झालेला गैरसमज…

अभिनेत्री रीटा भादुरी यांना दुसऱ्या कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांची चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरी तलाश में’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर रीटा भादुरी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. रीटा भादुरी यांनी 70 पेक्षा अधिक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण 17 जुलै 2018 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रीटा भादुरी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत फार मोठा खुलासा केलेला, त्यांना प्रचंड राग यायचा जेव्हा त्यांचं नाव बच्चन कुटुंबियांशी जोडलं जायचं. सांगायचं झालं तर, अभिनेत्री जया बच्चन यांचं लग्नापूर्वीचं नाव जया भादुरी होतं. त्यामुळे अनेकांना असं वाटायचं की, जया भादुरी आणि रीटा भादुरी एकमेकींच्या बहिणी आहेत. पण दोघींचा एकमेकींशी कोणताच संबंध नव्हता.

रीटा भादुरी म्हणालेल्या, ‘मी जयपूरला गेले होते, तेव्हा एकाने मला विचारलं की मी जया बच्चन यांची बहीण आहे का. ते ऐकून मला खूप राग आला होता. मी या क्षेत्रात बऱ्याच काळापासून काम करत आहे, तरीही माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही हे लोकांच्या लक्षात येत नाही. लोक अनेकदा मला जया यांची बहीण समजण्याची चूक करतात; आधी मला याचा राग यायचा, पण आता मला त्याचं काहीच वाटत नाही.’

रीटा भादुरी आयुष्य भर का राहिल्या एकट्या?

रीटा भादुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये पत्नी आणि आईची भूमिका साकारली. पण खऱ्या आयुष्यात त्या आई कधीत झाल्याच नाही. रीटा भादुरी यांनी कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. कायम स्वतःच्या विचारांवर जगणाऱ्या रीटा भादुरी यांनी लग्न का केलं नाही, याचं कारण कधी समोर आलंच नाही.

रीटा भादुरी यांचं निधन

रीटा भादुरी यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरच्या श्वास घेतला. 17 जुलै 2018 मध्ये अभिनेत्रीचं निधन झालं. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात रीटा भादुरी यांचं निधन झाले. 10 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. किडनीच्या समस्यांशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालें. विशेष म्हणजे, हिंदी सिनेमा आणि टीव्ही क्षेत्राव्यतिरिक्त रीटा भादुरी यांनी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...