Riteish Deshmukh: माझ्या वाईट काळात हिने.. रितेश देशमुख बायकोचं कौतुक करायला गेला अन्..
Riteish and Genelia Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलियाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघांची केमिस्ट्री केवळ चित्रपटांमध्येच नाही, तर सोशल मीडियावरही चाहत्यांना पाहायला मिळते. दोघंही एकमेकांची मजा घेतानाचे, चिडवतानाचे आणि खोड्या काढतानाचे व्हिडीओ सातत्याने शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या अशाच एका भन्नाट व्हिडीओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल होत असलेल्या या मजेशीर व्हिडीओमध्ये रितेश जिनिलियासोबत दिसत आहे. माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे, असं रितेश यात म्हणताना दिसतोय. पुढे तो मिश्कील अंदाजात त्यामागचं कारणसुद्धा सांगताना दिसतो. रितेशचं उत्तर ऐकल्यानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया मात्र पाहण्यासारखी आहे.
रितेशने प्रेम व्यक्त करताना “I Love My बायको” असं म्हटलं. मात्र त्यानंतर त्याने दिलेल्या कारणामुळे जिनिलिया थोडी नाराज झाल्याचं किंवा रुसल्याचं अभिनयातून दाखवते. रितेश-जिनिलियाच्या नात्यातील हीच गंमतीदार केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली आहे. या व्हिडीओ रितेश म्हणतो, “आय लव्ह माय बायको, माय वाइफ.. माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या वाईट काळातसुद्धा हिने मला नेहमीच साथ दिली आहे. कारण तो वाईट काळसुद्धा हिच्यामुळेच आला होता.” यावर जिनिलियाने दिलेली प्रतिक्रिया व्हिडीओचा सर्वात मजेशीर भाग ठरला आहे.
पहा व्हिडीओ-
पती-पत्नीमधील हा छोटासा संवाद पाहून सोशल मीडिया युजर्सनीही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी दोघांना “बेस्ट कपल” म्हटलं, तर काहींनी जिनिलियाच्या रिअॅक्शनची मजा घेतली. रितेश आणि जेनिलिया यांची अशी मजेशीर नोकझोक चाहत्यांसाठी नवीन नाही. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांची फिरकी घेताना दिसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक नवा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो.
रितेश आणि जिनिलियाची प्रेमकहाणीही त्यांच्या चाहत्यांसाठी खास आहे. दोघांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि पुढे प्रेमाचं नातं निर्माण झालं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केलं. त्यांना रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत. लग्नाला अनेक वर्षे झाली असली तरी दोघांच्या नात्यातील प्रेम आणि मैत्री आजही तितकीच दिसून येते. रितेश अनेकदा जिनिलियाबद्दल कौतुकाने बोलताना दिसतो.