Riteish Deshmukh | विवाहित पुरुषांसाठी रितेश देशमुखचा मोलासा सल्ला; म्हणाला “पत्नी जास्त कटकट करत असेल तर..”

रितेश आणि जिनिलिया यांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली.

Riteish Deshmukh | विवाहित पुरुषांसाठी रितेश देशमुखचा मोलासा सल्ला; म्हणाला पत्नी जास्त कटकट करत असेल तर..
Riteish Deshmukh and Genelia D'Souza
Image Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2023 | 1:10 PM

मुंबई : अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि तिचा पती रितेश देशमुख हे काही दिवसांपूर्वी ‘वेड’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तर रितेशनेच ‘वेड’चं दिग्दर्शन केलं होतं. रितेश आणि जिनिलियाची जोडी ही चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. चाहत्यांसोबत ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवरील त्यांचे रिल्स चाहत्यांना खूप पसंतीस येतात. रितेशने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या व्हिडीओतून रितेशने विवाहित पुरुषांना सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र सांगितला आहे. मात्र त्यात एक मजेशीर ट्विस्ट आहे.

या व्हिडीओमध्ये रितेश म्हणतोय, “जर तुमची बायको फार कटकट करत असेल तर चप्पल उचला आणि ती पायात घालून सरळ बाहेर निघून जा. त्यापलीकडे जास्त काहीच विचार करू नका. अन्यथा नको ते होऊन बसेल.” त्याच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. ’36 गुणांपैकी 35 गुण हे नवरीकडे असतात. नवऱ्याकडे एकच गुण असतो ते म्हणजे गप्प राहणं,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘डरपोक माणूस’ असं दुसऱ्या युजरने लिहिलंय. ‘पत्नीची भीती’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

रितेश आणि जिनिलिया यांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया डिसूझा यांची भेट झाली होती. आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. नोव्हेंबर 2014 रोजी, जिनिलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी दोघांनी ‘रायन’ ठेवले. या दोघांच्या दुसर्‍या मुलाचा जन्म जून 2016 मध्ये झाला आणि त्याचे नाव राहील असे ठेवले आहे.

पहा व्हिडीओ

रितेश-जिनिलियाच्या वेड या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये देशभरात 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मराठी चित्रपटाच्या दृष्टीने ही सर्वाधिक कमाई होती. तर मार्च महिन्यापर्यंत ‘वेड’ने देशात 61 कोटी रुपयांची कमाई केली होती. रितेश-जिनिलियाच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि जगभरात त्याने 73 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले होते. सैराटनंतर रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला.