AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rochak kohli: रोचक कोहली चे “पहली बार मिले” हे नवीन गाणे रिलीज

हे गाणे आर म्युझिकद्वारे सादर करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन गौतम गोविंद यांनी केले आहे.

Rochak kohli: रोचक कोहली चे पहली बार मिले हे नवीन गाणे रिलीज
R musicImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Dec 16, 2022 | 5:11 PM
Share

संगीत दिग्दर्शक रोचक कोहली (Rochak kohli) यांनी त्यांचे नवीन गाणे (New Song) “पहली बार मिले” नुकतेच रिलीज केले आहे. रोचक कोहली यांची’विक्की डोनर’ चित्रपटातील ‘पानी दा रंग’ आणि ‘अय्यारी’ चित्रपटातील (Film)’ले डुबा’ ही गाणी अधिक प्रसिध्द आहेत.

या नवीन कराराअंतर्गत रोचक कोहलीची पहिली रिलीज “पहली बार मिले” हा ट्रॅक आहे. तो त्यांनी दोन दिवसांपुर्वी रिलीज केला. रोचक कोहलीच्या ‘पहली बार मिले’ या नवीन गाण्यात, भारतातील अ‍ॅरेंज मॅरेजच्या परंपरेला चंचल आणि कोमल रचनेतून दर्शविण्यात आले आहे. हे गाणे आपल्याला प्रेम, स्विकार आणि आनंदाच्या प्रवासाला घेऊन जाते. या गाण्यात एक नवविवाहित जोडपे टॉय ट्रेनमध्ये बसून हिमालयाचे सौंदर्य न्याहाळत त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात मग्न झालेले दिसत आहेत.

रोचक कोहली म्हणतात, “आपल्या देशात प्रतिभेचा सागर आहे” आणि आर म्युझिकच्या सहाय्याने संगीत कलाकारांची पुढची पिढी विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच आम्ही पहिल्याच वर्षी 25 ओरिजनल गाणी रिलीज करण्याची योजना आखली आहे. ज्यामध्ये आमचे लक्ष गाण्यांच्या गुणवत्तेवर आहे. अमित आणि इनग्रूव्हज हे माझे भागीदार आहेत याचा मला आनंद आहे. हा प्रवास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

हे गाणे आर म्युझिकद्वारे सादर करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन गौतम गोविंद यांनी केले आहे. गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी यांनी लिहिले असून पियुष अग्निहोत्री याचे निर्माता आहेत.

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती