Vatsala Rajagopal: ‘रोजा’ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे निधन, ६० व्या वर्षी केला होता डेब्यू

Vatsala Rajagopal: वयाच्या 60व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे निधन झाले आहे. त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Vatsala Rajagopal: ‘रोजा’ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे निधन, ६० व्या वर्षी केला होता डेब्यू
Vatsala Rajagopal
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 7:48 AM

भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित एक वाईट आणि दुःखद बातमी समोर येत आहे. ‘रोजा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. ३० ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळातील आजारांना झुंज देत होत्या. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळबळ व्यक्त केली जात आहे. सध्या वत्सला यांचे पार्थिव शरीर त्यांच्या निवासस्थानी (पल्लवरम) ठेवण्यात आले आहे.

वत्सला राजगोपाल यांचा जन्म १९३३ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झाला होता. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या ६० व्या वर्षी केली होती. त्यांचा अभिनय डेब्यू मणिरत्नम यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘रोजा’मधून झाला. १९९२ च्या या चित्रपटात वत्सला यांनी अभिनेत्री मधू यांच्या आजीची भूमिका साकारली होती. चित्रपटात मधू यांच्या समोर अरविंद स्वामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

Loading...

कधी करायच्या क्लर्क म्हणून काम

वत्सला यांना सुरूवातीपासूनच अभिनयाची आवड होती. त्या शाळेत असतानाच थिएटर आणि नृत्याच्या जगाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. अभिनेत्री होण्यापूर्वी त्यांनी चेन्नईमध्ये क्लर्क म्हणून अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात नोकरी केली होती.

४०० हून अधिक चित्रपटांत केले काम

वत्सला राजगोपाल तमिळ सिनेमातील एक ओळखले जाणारे नाव होत्या. रोजा व्यतिरिक्त त्यांनी प्रेक्षकांची मने ‘धाम धूम’, ‘मोझी’, ‘साथी लीलावती’, ‘रिदम’, ‘विनर’, ‘अनियन’, ‘पट्टियल’ आणि ‘कल्याण समायल सादम’ सारख्या अनेक चित्रपटांद्वारे जिंकली. वत्सला आपल्या तीन दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांचा भाग होत्या. या काळात त्यांना एकाहून एक अभिनेते आणि चित्रपटनिर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

या टीव्ही शोजमध्येही दिसल्या

मोठ्या पडद्यावर आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या वत्सला राजगोपाल छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय होत्या. दिवंगत अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची छाप ‘चिथी’, ‘आनंदम’, ‘कधई नेरम’, ‘मुंधनाई मुदिचु’, ‘आडूगिरेन कन्नन’, ‘कढ़ाल पगड़ाई’, ‘मगल’, ‘मुन्थनै मुदिचु’ आणि ‘वसंतम’ सारख्या शोजमधूनही सोडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us