प्रचंड रोमँटिक गाणं, 100 वेळा ऐकूनही भरत नाही मन, 36 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडीचं

36 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे आजही नुसतं ऐकू आलं तरी अनेकजण होतात रोमँटिक. काहीजण तर हे गाणं दिवसभर गुणगुणतात. तुम्ही ऐकलं का?

प्रचंड रोमँटिक गाणं, 100 वेळा ऐकूनही भरत नाही मन, 36 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडीचं
| Updated on: Aug 31, 2026 | 1:23 PM

प्रत्येक काळात काही गाणी अशी असतात जी केवळ संगीत राहत नाहीत तर आपल्या आठवणींचा अविभाज्य भाग बनतात. प्रवासात अचानक एखाद्या जुन्या गाण्याची धून कानावर पडली की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. मोबाईल, सोशल मीडिया आणि ओटीटीच्या युगातही 90 च्या दशकातील काही गाण्यांची लोकप्रियता आजही कायम आहे.

याच यादीतील एक खास गाणे म्हणजे ‘आशिकी’ चित्रपटातील ‘साँसों की जरूरत है जैसे’. कुमार सानू यांच्या मधुर आवाजाने सजलेले हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रिय झाले. प्रेमगीत म्हटले की आजही अनेक संगीतप्रेमींच्या ओठांवर या गाण्याचे नाव सहज येते.

गाणं सुरु होताच प्रेक्षक होतात रोमँटिक

या गाण्याला संगीताची साथ दिली होती प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी तर गीतकार समीर यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते. त्यांच्या सुरेल संगीत आणि भावपूर्ण शब्दांमुळे हे गाणं त्या काळात कॅसेट प्लेअरपासून ते बसपर्यंत सर्वत्र ऐकायला मिळत होते.

चित्रपटात हे गाणे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यातील प्रेमभावना, सुरेल चाल आणि कुमार सानू यांचा आवाज यामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली. आजही हे गाणे ऐकताना अनेकांना त्या काळातील रोमँटिक वातावरणाची आठवण होते.

काळ बदलला पण गाण्याची क्रेझ कायम

विशेष म्हणजे या गाण्याचे फीमेल व्हर्जनही रेकॉर्ड करण्यात आले होते. ते अनुराधा पौडवाल यांनी गायले होते. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील आवृत्त्यांमुळे या गाण्याला दोन वेगवेगळ्या भावछटा मिळाल्या.

काळ बदलला, संगीत ऐकण्याची माध्यमे बदलली, मात्र या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. जुन्या संगीतप्रेमींसाठी हे गाणं आजही प्रचंड आवडीचे असून ते नव्या पिढीलाही मोठ्या प्रमाणात आवडीचे ठरत आहे. गाण्याचे संगीत देखील अनेक प्रेक्षकांना आकर्षित करते. त्यामुळेच ‘साँसों की जरूरत है जैसे’ हे गाणं आजही 90च्या दशकातील सदाबहार रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणून रसिकांच्या मनात कायम आहे.

Follow Us