AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?

Aditi Tatkare PRO: एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंत्री आदिती तटकरे यांचे पीआरओ म्हणून काम करत असलेल्या आशिष मेटे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?
आशिष मेटेImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 1:51 PM
Share

मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पीआरओ म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृताचे नाव आशिष मेटे असे आहे. भांडूप येथील इमारतीच्या आवारात फिरत असताना अचानक तरुण खाली कोसळला आणि त्याचा डोक्याला जोरात मार लागला. त्यानंतर तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष मेटे हे जेवण झाल्यानंतर इमारतीच्या आवारात चालत होते. चालताचालता ते अचानक कोसळले. जमिनीवर कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. परिसरातील लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

कोण आहेत आशिष मेटे?

आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत थेट सरकारी सेवेत नसून एका पब्लिक रिलेशन कंपनीच्या माध्यमातून बाह्य यंत्रणेद्वारे पीआरओ म्हणून काम पाहत होते. मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रसिद्धी आणि जनसंपर्क विषयक कामे ते हाताळत होते, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेची बातमी समोर आल्यानंतर भांडूप पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. तसेच आशिष मेटे यांचे शव पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. त्या अहवालाच्या आधारे पुढील तपास दिशा ठरेल.

आशिष मेटे यांचे कुटुंबीय या अचानक झालेल्या मृत्यूने शोकाकुल झाले आहेत. परिसरातील लोकांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. पोलिसांनी सांगितले की, सध्या कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही. तरीही सर्व बाजूंनी तपास सुरू असून घटनाक्रम आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Follow Us
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! कोर्टाने याचिका फेटाळली, पण
Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण...
प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप, अचानक...
बाळासाहेबांचं नाव वापरून कोट्यवधींचा... प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
मोठा एल्गार! मुंबईला जायची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगेंचं मराठा...
मोठा एल्गार! मुंबईला जाण्याची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
New Delhi Crime | महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, नेमकं घडलं काय?
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या...
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या निवडणुकीत...
जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल..
Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?
Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात
भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी!
Asaduddin Owaisi | भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी! असदुद्दीन ओवैसींचा थेट हल्लाबोल