
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला. घरात घुसून चोरट्याने त्याच्यावर हल्ला केला. हा चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरी आणि तेही 11 व्या मजल्यावर चोर शिरतो ही धक्कादायक बाब आहे. यामुळे मुंबईतील घरे किती सुरक्षित आहे हा प्रश्न निर्माण होतो. पण हा प्रश्न काही एकट्या मुंबई पुरताच असू शकत नाही. चोरी कुठेही होऊ शकते. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घराची सुरक्षा किती सुरक्षित आहे हे पाहा. आताच ते चेक करा. नसेल तर खाली काही टिप्स दिल्या आहेत, त्याचा अवलंब करा.
आपण सर्वच घराची सुरक्षा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी मोठे कुलूपं लावतो. आता तर सीसीटीव्हीचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले असतात. पण असं असलं तरी वेळोवेळी आपल्या सेक्युरिटी सिस्टिमचा आढावा घेतला पाहिजे. सिस्टीम व्यवस्थित सुरू आहे की नाही याची माहिती ठेवली पाहिजे. नादुरुस्त गोष्टी दुरुस्त करून घेतल्या पाहिजे. नाही तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं प्रसंग ओढवता कामा नये. एक लक्षात ठेवा, आपण जेवढे सतर्क होतो, तेवढेच चोर सुद्धा शातिर असतात. त्यामुळे घराच्या सुरक्षेबाबत नेहमीच सजग असलं पाहिजे.
तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे, सावध राहणे हाच बचावाचा मार्ग आहे. या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजे. तुम्ही घरी असो अथवा नसो पण घर नेहमी सुरक्षित राहिलं पाहिजे. जर घरात लहान मुलं, बुजुर्ग किंवा महिला असतील तर सुरक्षा आणखीनच मजबूत असली पाहिजे. घराची सुरक्षा नेमकी कशी असली पाहिजे, याच्याच आम्ही तुम्हाला टिप्स देत आहोत.
घर सुरक्षित ठेवण्याचे उपाय
सुरक्षेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या असतात. त्यामुळे दरवाजाला नेहमी मजबूत कुलूप लावा. सुरक्षेसाठी डिजिटल लॉक आणि बायोमेट्रिक लॉकसारख्या आधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर करा.
खिडक्यांवर ग्रील किंवा मजबूत बार लावा. शटर, रोलर ब्लाइंड्स किंवा लॉकिंग सिस्टमचा वापर करा. खिडक्यांवर शॉक सेंसर्स किंवा ग्लास ब्रेक अलार्म लावून त्यांची सुरक्षा वाढवा.
घराच्या मुख्य गेटला लोखंडी किंवा मजबूत जाळी लावून बनवा. बॉर्डर वॉलवर स्पाइक्स किंवा इलेक्ट्रिक फेन्सिंगचा वापर करा.
घराच्या मुख्य प्रवेशद्वार आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावा. सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईल अॅपद्वारे मॉनिटर करण्याची सुविधा मिळवून घ्या.
स्मार्ट डोरबेल आणि अलार्म सिस्टम लावा. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती मिळेल. घराच्या आत आणि बाहेर मोशन सेंसर्स लावा.
घरातील प्रत्येक सदस्याकडे वैयक्तिक सुरक्षा अलार्म असावा. मुलांना सुरक्षा नियम शिकवा.
घराच्या बाहेर आणि गेटजवळ पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवा. सोलर लाईट्स आणि ऑटोमॅटिक लाईटिंग सिस्टम वापरा. मूव्हमेंट सेंसिंग लाईट्स खूप उपयुक्त ठरू शकतात.
जर काही घडले, तर तुमचे शेजारीच तुम्हाला पहिली मदत करतात. म्हणून शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. शेजाऱ्यांसोबत एक “नेबरहुड वॉच” टीम तयार करा. सामुदायिक सुरक्षा कार्यक्रमांमध्ये भाग घ्या.
सुरक्षा साधण्यासाठी एक प्रशिक्षित गार्ड डॉग ठेवणे एक चांगला पर्याय होऊ शकतो. गरज भासल्यास सिक्योरिटी गार्डची मदत घ्या.
घरात फायर डिटेक्टर आणि स्मोक अलार्म लावा. गॅस लीक डिटेक्टरचा वापर करा आणि नियमितपणे पाइपलाइन तपासा. आग विझवण्यासाठी फायर एक्सटिंग्युशर घरात ठेवून त्याचा वापर कसा करावा हे शिका.
आपल्या गॅरेजमध्ये ऑटोमॅटिक दरवाजांचा वापर करा. ड्राइववेवर सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोशन सेंसर्स लावा. गॅरेजच्या दरवाजे आणि खिडक्यांना बंद ठेवा.
घराच्या चारही बाजूंनी इंट्रूडर डिटेक्शन सिस्टम लावा. अशा सिस्टममध्ये दरवाजे आणि खिडक्यांची उघडण्याची माहिती लगेच मिळवता येते.
सध्या उत्तम सुरक्षेसाठी उच्चस्तरीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तुम्ही स्मार्ट होम सिक्योरिटी सिस्टम (जसे की Google Nest, Ring इत्यादी ) लावू शकता. रिमोट कंट्रोल आणि लाइव्ह फीड देणारे उपकरणे वापरा. व्हॉईस कंट्रोलसाठी Alexa किंवा Google Assistant ला सुरक्षा प्रणालीशी जोडा.
घराच्या Wi-Fi ला पासवर्डने ठेवा. कॅमेरे आणि सुरक्षा प्रणालीचे डिव्हायस हॅकिंगपासून वाचवण्यासाठी त्यांना अद्ययावत ठेवा. मजबूत पासवर्ड आणि अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घरातील सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर शिकवा. मुलांना अनोळखी व्यक्तींशी संवाद न करण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे शिकवा. प्रत्येक सदस्याला एक्झिट प्लॅन आणि आपत्कालीन संपर्कांची माहिती द्या.
घर आणि मालमत्तेचा विमा काढा, जेणेकरून चोरी, आग किंवा इतर आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. याचे नियमित ऑडिट करा.