‘खूप आव्हानात्मक दिवस,अजूनही परिस्थिती…,’सैफवरील हल्ल्यानंतर काय म्हणाली करीना
वांद्रे येथील निवासस्थानी चोरट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याचा चेहरा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या निवासस्थानी अज्ञाताने हल्ला केल्यानंतर सैफ अली खानची पत्नी करीना कपूर हीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात तिने या घटनेनंतर आम्ही अजूनही सावरलेलो नाही, कृपया काहीही करु स्पेक्युलेशन करु नका आम्हाला सावरायला वेळ द्या, आम्हाला थोडी स्पेस द्या अशी विनंती मिडिया आणि पाप्पाराझींना केली आहे.
पती सैफ अली खानवर हल्ल्या झाल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर हीने आपलं मत सोशल मिडिया वरुन जाहीर केले आहे. या निवेदनात करीना म्हटलंय की, ‘आमच्या कुटुंबासाठी हा एक धक्कादायक आणि चॅलेजिंग दिवस होता. आम्ही अजूनही घडलेल्या घटनेतून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे . त्यामुळे या घटनेचा सातत्यपूर्ण ‘फॉलोअप आणि कव्हरेज’ टाळण्याची विनंती करीया कपूर खान हीने माध्यमांना केली आहे. “आमच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी आम्हाला थोडी स्पेस द्या अशीही विनंती करीना हीने केली आहे.
आमच्या फॅमिलीसाठी हा एक अविश्वसनीय आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही घडलेल्या घटनांवर प्रतिक्रीया देण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कठीण काळातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की मीडिया आणि पापाराझींनी सतत्याने स्पेक्युलेशन आणि कव्हरेज टाळावे असे आवाहन करीना हीने केले आहे.




आम्ही तुमची काळजी आणि पाठिंब्याचे स्वागत करतो, परंतु सातत्याने पाठपुरावा करणे आणि दखल घेणे ही जबरदस्तीच नाही तर आमच्या सुरक्षिततेसाठी देखील एक मोठा धोका निर्माण करते. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या खाजगी जीवनाचा आदर करा आणि कुटुंब म्हणून आम्हाला सावरण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली स्पेस द्या..या संकटकाळात तुमच्या समजूतदारपणा आणि सहकार्याबद्दल मी तुमचे आगाऊ आभार मानते असेही शेवटी करीना कपूर खान ही छोटेखाणी निवदेनात म्हटले आहे.
मणक्यात चाकूचे पाते अडकले होते
सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी अज्ञात हल्लेखोराने गुरुवारी मध्यरात्री हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सैफवर सहा वार झाले असून त्यातील दोन वार गंभीर स्वरुपाचे आहेत. सैफ याच्या मणक्यात स्पायनल कॉडला जखम झाली आहे. त्याच्यावर लीलावतीत शस्रक्रिया करुन चाकूचे अडकलेले पाते हाडातून बाहेर काढले आहे. या प्रकरणात अद्यात हल्लेखोराचा शोध सुरु आहे.