‘मुझे लडका नही मर्द चाहिए था…’, 19 व्या वर्ष लग्न मोडल्यानंतर सैफ अली खानची बहीण आजही अविवाहित, अनेक वर्षानंतर मोठा खुलासा

वयाच्या 50 व्या वर्षी देखील अविवाहित आहे सैफ अली खान याची मोठी बहीण, अनेक वर्षानंतर मनातील खंत अखेर केली व्यक्त...

मुझे लडका नही मर्द चाहिए था..., 19 व्या वर्ष लग्न मोडल्यानंतर सैफ अली खानची बहीण आजही अविवाहित, अनेक वर्षानंतर मोठा खुलासा
सैफ अली खान - सबा अली खान
| Updated on: Aug 07, 2026 | 8:19 AM

अभिनेता सैफ अली खान आणि त्याची लहान बहीण सोहा अली खान हिला सगळेच ओळखतात. पण त्यांच्या मोठ्या बहिणीबद्दल फार कोणाला माहिती नाही. सैफ याच्या मोठ्या बहिणीचं नाव सबा अली खान असं आहे. सबा लाईमलाईटपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सैफ आणि सोहा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत, पण सबा आज वयाच्या 50 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगत आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सबा हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. वयाच्या 19 व्या वर्षी लग्न मोडल्यानंतर सबा अली खान म्हणाली, ‘मुझे मर्द चाहिए था… लडका नही…’, जाणून घ्या सबा नेमकं काय म्हणाली.

सांगायचं झालं तर, अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांच्या नुकताच झालेल्या व्लॉगमध्ये सबाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सबा म्हणाली, ‘माझा कोणी पहिला बॉयफ्रेंड नव्हता. लग्नासाठी मला स्थळं येत होती. पण कोणीच मला माझ्यासारखा वाटला नाही. वयाच्या 19 व्या वर्षी माझी भेट एका कोलकाता येथील व्यक्तीसोबत झालं. त्या व्यक्तीसोबत माझं लग्न जवळपास ठरलंच होतं. पण ते होऊ शकलं नाही… खंर तर त्या नात्यासाठी मी स्वतः तयार नव्हती…’

वय वाढल्यानंतर देखील सबा लग्नासाठी तयार होती… यावर सबा म्हणाली, ‘मला फक्त एक अशी व्यक्ती हवी होती, जी खरंच माझ्यासोबत जुळवून घेईल आणि खरं सांगायचं झालं तर, अब्बा सारख्या वडिलांनंतर… ते खरंच उत्तम व्यक्ती होते. असं नाही की, मी समोरच्या मुलामध्ये माझ्या वडिलांसारखे गुण असावेत… अशी माझी अट कधीच नव्हती… पण अखेर वडील तर वडील असतात.’

दिवंगत वडील मंसूर अली खान यांच्याबद्दल बोलताना सबा म्हणाली, ‘माझे वडील खरंत ग्रेट, विनम्र आणि जबाबदार व्यक्ती होती. त्यांनी कायम आम्हाला आत्मनिर्भर होण्यास सांगितलं… तापसी पन्नू हिने एकदा सांगितलेलं, ‘मुझे किसी लडके की नाही, एक मर्द की जरुरत है…’, मला तापसी हे वक्तव्य खरंच पटलं… आणि माझ्या आयुष्यात तशी व्यक्ती आलीच नाही… अलं देखील सबा अली खान म्हणाली.

सबा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती अभिनेत्री शर्मिला टागोर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांची सर्वात मोठी मुलगी आहे. सबा सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us