
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांना दोन मुलं आहे. दोघांच्या मुलीचं नाव सारा अली खान असं आहे. सारा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. फार कमी काळात सारा हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता सारा हिचा भाऊ इब्राहिम अली खान याने देखील इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. इन्स्टाग्रामवर पदार्पण केल्यानंतर इब्राहिम याने स्वतःचे चार फोटो देखील पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र इब्राहिम याच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
वेगवेगळ्या अंदाजात इब्राहिम याने फोटो पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्राम येताच इब्राहिम याचे 581K फॉलोअर्स झाले आहेत. तर इब्राहिम फक्त 42 लोकांना फॉलो करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इब्राहिम याच्या इन्स्टाग्रामची चर्चा रंगली आहे. चाहते देखील इब्राहिम याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
इन्स्टाग्रामवर इब्राहिम अली खाली, सारा अली खान, करीना कपूर, सोहा अली खान, आलिया भट्ट, अमृता सिंह, फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा, रोहित शेट्टी, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जेहान हांडा, के कौर, खुशी कपूर, रणवीर सिंग, अरहान खान, संदीप खोसला, टेबल टेनिस प्लेयर मुदित दानी, अलाविया, चेस्ला फॅन क्लब, अनन्या पांडे, करण जोहर, आर्यन खान, कुणाल खेमू, अली हाजी, शनाया कपूर, अलीजेह अग्निहोत्री, सुहाना खान, शिखर पहाडिया या सेलिब्रिटींसोबत स्वतःच्या मित्रांना देखील फॉलो करत आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी गेल्या कित्येक दिवसांपासून जोर धरला आहे. अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण चाहत्यांना दोघांची जोडी प्रचंड आवडते.
सांगायचं झालं तर, पलक आणि इब्राहिम दोघे प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुलं असल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. इब्राहिम अभिनेता सैफ आली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा मुलगा आहे. इब्राहिम कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी का जान’ सिनेमातून पलक चाहत्यांच्या भेटीस आली. सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. वयाच्या 23 व्या वर्षी पलकने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.