
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली पाहायला मिळते. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या ‘सैयारा’ चित्रपटातून पदार्पण केलं आहे आणि त्यांच्या दोघांच्याही अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 83 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘सैयारा’ने 21 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे, दुसऱ्या दिवशी 25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे आणि यासोबतच तो 1oo कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास आता सज्ज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येत आहे, विशेषतः तरुणांमध्ये हा चित्रपट जास्त पसंत केला जात आहे. पण जो चित्रपट सध्या एवढा चर्चेत आहे त्या चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ माहित आहे का? ‘सैयारा’ चा अर्थ काय माहितीये. चला जाणून घेऊयात.
‘सैयारा’ हा शब्द उर्दू आणि अरबी भाषेतून आला आहे.
‘सैयारा’ हा शब्द उर्दू आणि अरबी भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ आकाशात फिरणारा तारा किंवा खगोलीय पिंड असा होतो. उर्दू भाषेत, सय्यारा हा शब्द सामान्यतः आकाशात फिरणाऱ्या ग्रह किंवा ताऱ्यांसाठी वापरला जातो आणि अरबी भाषेत याचा अर्थ सतत फिरतीवर असणारा किंवा निरंतर चालत असणारा व्यक्ती असा होतो. याशिवाय, प्रेमात पडलेल्या एकाकी व्यक्तीला देखील सय्यारा अस म्हटलं जातं.
ट्रेलरमध्ये सैयाराचा अर्थ देखील स्पष्ट केला आहे.
‘सैयारा’च्या अधिकृत ट्रेलरमध्येही या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे. ट्रेलरच्या एका दृश्यात, अनीत पड्डा अहान पांडेला सैयरा या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना दिसत आहे. तो म्हणतो ‘सैयारा म्हणजे ताऱ्यांमध्ये एकटा असणारा तारा. जो स्वतःला प्रकाशित करून संपूर्ण जगाला प्रकाशित करतो. आणि तू माझी सैयरा आहेस.’ या चित्रपटाची कथा देखील याच शब्दाभोवती फिरताना दिसते.
‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला
मोहित सुरी दिग्दर्शित, सैयारा यांनी अवघ्या तीन दिवसांत 83 कोटींचा गल्ला जमवला आहे आणि तो या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. हा चित्रपट 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘निकिता रॉय’ सोबत त्याची टक्कर झाली. या सर्व चित्रपटांना मागे टाकत, सैयारा आता प्रेक्षकांचा आवडता चित्रपट बनला आहे आणि कमाईच्या बाबतीतही त्याने त्यांना मागे टाकले आहे. सैयारा यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांमध्ये आपले स्थान पक्के केले होते. रविवारी तर ‘सैयारा’ने एकूण 71.18% हिंदी ऑक्युपन्सी नोंदवली आहे.