याची DNA चाचणी करा; साजिद खानचा मुलगा हुबेहुब सलमानसारखा दिसतातच नेटकऱ्यांची मागणी

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दिसणारा साजिद नाडियाडवालाचा मुलगा हुबेहुब सलमान सारखा दिसत असल्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

याची DNA चाचणी करा; साजिद खानचा मुलगा हुबेहुब सलमानसारखा दिसतातच नेटकऱ्यांची मागणी
Sufyan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 12:42 PM

सोशल मीडियावर सध्या प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला यांच्या मुलाने सूफयानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सूफयानला पाहून सगळेजण चक्रावून गेले आणि त्याची तुलना बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी करु लागले आहेत. सूफयानला अलीकडेच मुंबईत एका ठिकाणी गेला होता आणि तिथे तो पपाराजीसमोर येऊन पोज देऊ लागला. त्या पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सूफयानला पाहून असे वाटले की जणू ९० च्या दशकातील सलमान खान समोर आला आहे. त्याचे नाक, डोळे आणि लुक्स, बॉडी पाहून अनेकांना 90च्या दशकातील सलमान खान आठवला आहे.

साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा, अगदी सलमान खानसारखा

Loading...

सूफयानचा व्हिडीओ पाहतापाहता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि सगळेजण त्याला पाहून ‘सलमान खान’च म्हणत आहेत. सूफयानने निळ्या रंगाचा एकदम टाइट फिटिंगचा टी-शर्ट, जीन्स आणि कानांमध्ये बाली घातली होती. त्याचा हा लुक अगदी तसाच होता, जसा एकेकाळी सलमानचा ९० च्या दशकात पाहायला मिळत असे. व्हिडीओवर लगेचच युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी

सूफयान नाडियाडवालाला पाहून अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, ‘हा तर सलमान खानचा यंगर व्हर्जन वाटत आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘जेनेटिक्सही सलमान खानसारखे आहेत.’ आणखी एक कमेंट आला, ‘हा तर ९०s चा सलमान खान आहे.’ तर काही युजर्सनी सूफयानला त्याचे वडील साजिद नाडियाडवाला यांच्यासारखे सांगितले. कोणी विजय वर्मा आणि हॉलिवूड स्टार टॉम हॉलंड यांच्याशीही तुलना केली. एका यूजरने तर याची DNA चाचणी करा अशी कमेंट केली आहे.

सूफयान नाडियाडवाला कोण आहे?

सूफयान हा प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला आणि पत्नी वर्धा नाडियाडवाला यांचा लहान मुलगा आहे. त्यांचा मोठा मुलगाही आहे, ज्याचे नाव सुभान आहे आणि तो लवकरच अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सुभानच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ऐसी दीवानगी’ आहे आणि हा चित्रपट शशांक खैतान दिग्दर्शित करीत आहेत. तर सूफयानला सध्या चित्रपटांमध्ये एंट्री करण्याचा कोणताही विचार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us