
कोरोनाच्या परिस्थितीनं जगात धुमाकूळ घातलाय त्यामुळे हा काळ सर्वांसाठी खूप कठीण आहे. कोरोनामुळे अनेकांना शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागतंय.

अश्यावेळी आपण गरजू लोकांसाठी काय करू शकते हा विचार अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या मनात आला, त्यानंतर तिला आणि तिच्या मैत्रिणीला एक भन्नाट कल्पना सुचली.

गेले अनेक दिवस प्रार्थना नवनवीन सुंदर पेंटिंग्ज तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर करतेय. तर मग या पेंटिंग्ज विकून आपण लोकांना मदत करू शकतो हा विचार तिच्या मनात आला.

त्यामुळे आता तिनं काही पेंटिंग्ज सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

प्रार्थनाच्या या पेंटिंग्ज प्रचंड सुंदर आहेत आणि चाहत्यांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय.