AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan याच्या कमाईत होणार मोठी वाढ; भाईजान मुंबईमध्ये बांधतोय १९ मजली हॉटेल

'ही' खास व्यक्ती आहे सलमान खान याच्या १९ मजली हॉटेलची मालकीण; भाईजानचं हॉटेल व्यवसाय क्षेत्रात दमदार पदार्पण..., सध्या सर्वत्र भाईजान आणि त्याच्या नव्या व्यवसायाची चर्चा

Salman Khan याच्या कमाईत होणार मोठी वाढ; भाईजान मुंबईमध्ये बांधतोय १९ मजली हॉटेल
| Updated on: May 20, 2023 | 3:05 PM
Share

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. पण भाईजानचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. आता अभिनेता हॉटेल व्यवसाय क्षेत्रात दमदार पदार्पण करत आहे. सलमान खान आणि त्यांचं कुटुंब सी-फेसिंग हॉटेल बांधण्याच्या तयारीत आहेत… सलमान खान याने एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे… ज्याठिकाणी खान कुटुंब भव्य हॉटेल बांधण्याच्या विचारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान कार्टर रोड, वांद्रे येथे हे हॉटेल उघडण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान भक्कम केल्यानंतर सलमान खान व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

रिपोर्ट्सनुसार, सलमान खान याचं हॉटेल १९ मजली असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेत्याच्या हॉटेलला बीएमसीकडून मान्यता देखील मिळाली आहे.. सलमान खान आणि त्याच्या भावांनी यापूर्वी इमारतीत स्वत:साठी अपार्टमेंट खरेदी केले होते आणि सुरुवातीला निवासी मालमत्ता म्हणून त्याचे नूतनीकरण करण्याची खान भावंडांची योजना होती.

पण आता खान कुटुंबाने १९ मजली हॉटेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र खान कुटुंबाच्या नव्या व्यवसायाची चर्चा आहे. सलमान खान याची प्रॉपर्टी आई सलमा खान यांच्या नावावर आहे. सलमान खानच्या या १९ मजली हॉटेलची उंची ६९.९ मीटर असेल. बीएमसीकडे सादर केलेल्या प्रस्तावात पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट्स असणार आहे.. असं सांगण्यात येत आहे…

एवढंच नाही तर तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असणार आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सर्विस आणि पाचव्या, सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्याची योजना आहे. तर सातव्या ते १९व्या मजल्याचा वापर हॉटेलसाठी केला जाणार आहे. सलमान खान याच्याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी हॉटेल क्षेत्रात दमदार पदार्पण केलं आहे.

दरम्यान, सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी जान’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. पण सिनेमा चाहच्यांचं मनोरंजन करु शकला नाही. ‘किसी का भाई किसी जान’ सिनेमात अनेक नव्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता अभिनेता ‘टायगर ३’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल