AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: आयुष्यातला एक दिवस कमी..; वडील सलीम खान यांच्यासाठी सलमानची पोस्ट, चाहते भावूक

Salman Khan: सलमान खान आणि सलीम खान यांच्यातील नात्याची झलक या फोटोंमधून पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. वडिलांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या चाहत्यांसाठी ही पोस्ट खास आहे. त्यामुळेच सलमानच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Salman Khan: आयुष्यातला एक दिवस कमी..; वडील सलीम खान यांच्यासाठी सलमानची पोस्ट, चाहते भावूक
Salman Khan with Salim KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2026 | 9:25 AM
Share

Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्याने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलमानने त्याचे वडील आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने लिहिलेल्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ‘बाप बाप होता है’, ‘ते खरे मॉनस्टर आहेत’ आणि ‘देव दयाळू आहे’ अशा शब्दांत सलमानने वडिलांप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सलीम खान यांना यावर्षी ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता होती. त्यामुळे सलमानची ही पोस्ट अनेकांसाठी भावनिक ठरत आहे.

सलमान खानने इन्स्टाग्रामवर वडील सलीम खान यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही डोक्यावर हॅट घालून खास अंदाजात पोझ देताना दिसत आहेत. बाप-लेकाची ही जोडी एकत्र दिसत असल्याने चाहत्यांना त्यांचे फोटो विशेष आवडत आहेत. आणखी एका फोटोमध्ये सलमान वडिलांसमोर बसलेला असून त्याने सलीम खान यांचे दोन्ही हात आपल्या हातात धरले आहेत. या फोटोमधून दोघांमधील जिव्हाळा आणि प्रेम दिसून येते. सलमानची ही पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून अनेकजण कमेंट्समधून सलीम खान यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

पहा पोस्ट-

सलमानच्या कॅप्शनची चर्चा

या फोटोंना सलमानने हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले, ‘कसा आहेस पार्टनर? वयाच्या 91 व्या वर्षीही एक नंबरचा जलवा. बाप हा बापच असतो, तो खरा मॉनस्टर आहे. आपल्या सर्वांच्या बापात आहे दम. वंदे मातरम्! एक दिवस अधिक मिळत नाही, तर आयुष्यातला एक दिवस कमी होत असतो. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय? देवाची कृपा आहे.’ या कॅप्शनमधून सलमानने वडिलांना ‘रिअल मॉन्स्टर’ म्हणत त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. ‘बाप बाप होता है’ या शब्दांतून वडिलांची ताकद आणि त्यांचं महत्त्व अधोरेखित केले आहे. तर ‘God’s been kind’ म्हणत त्याने देवाचे आभार मानल्याचंही दिसतंय.

सलिम खान यांना झाला होता ब्रेन हॅमरेज

सलिम खान यांच्या प्रकृतीबाबत यावर्षी फेब्रुवारीमध्ये चिंता निर्माण झाली होती. 17 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना सौम्य स्वरूपाचा ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करण्यात आले. त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. यानंतर सलिम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. मार्चमध्ये ईदच्या दिवशी ते कुटुंबासोबत चाहत्यांना अभिवादन करताना दिसले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पाहून चाहत्यांनाही दिलासा मिळाला होता.

Follow Us
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी