सलमान खान गर्लफ्रेंडमध्ये कोणती गोष्ट शोधतो? भाईजानच्या वडिलांकडून मोठा खुलासा
Salman Khan Wedding: सलमान खान याचं लग्न न होण्यामागचं कारण अखेर आलं समोर, भाईजानचे वडील म्हणाले, 'तो गर्लफ्रेंडमध्ये अशी गोष्ट शोधतो जी...', सध्या सर्वत्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Salman Khan Wedding : अभिनेता सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला माहिती नाही, असं कोणी नाही. अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खान याच्या नावाची चर्चा रंगली, पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचली नाही. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याआधी देखील सलमान यांचं नाव अनेक अनेक अभिनेत्रींसोबत जोण्यात आलं. ऐश्वर्या हिच्यानंतर सलमान खान याच्या आयुष्यात अभिनेत्री कतरिना कैफ याची देखील एन्ट्री झाली. पण लग्न होऊ शकल नाही. अखेर कतरिना हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं.
आज सलमान खान साठीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पण अद्यापही त्याचं लग्न झालं नाही. दरम्यान एका मुलाखतीत, सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी भाईजानचं लग्न न होण्यामागचं कारण सांगितलं होतं… सलमान खान याच्या आईमुळे त्याचं लग्न होतं नाही… असा मोठा खुलासा सलीम खान यांनी केला होता.
एका जुन्या मुलाखीत सलीम खान म्हणालेले, ‘सलमान याच्या अनेक गर्लफ्रेंड झाल्या आहेत. पण तो कायम त्यांच्या गर्लफ्रेंडमध्ये स्वतःच्या आईला पाहायचा. जेव्हा सलमान असं करायचा तेव्हा ती मुलगी पळून जायची… आई प्रमाणे बायको देखील त्याच्यावर प्रेम करेल.. अशी सलमानची इच्छा होती. पण त्याचं कोणतंच नातं फार काळ टिकलं नाही.’ असं देखील सलीम खान म्हणाले.’
सलमान खानच्या गर्लफ्रेंड्स इंडस्ट्रीमधील होत्या, ज्यामुळे करियर आणि खासगी आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन फार वेगळा होता.. याकारणामुळे देखील सलमान खान याचे ब्रेकअप झाले… असं देखील सलीम खान म्हणाले.
अभिनेता सलमान खान याच्या गर्लेफ्रेंडबद्दल सांगायचं झालं तर, सुरुवातीला अभिनेत्यांचं नाव अभिनेत्री संगिता बिजलानी हिच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. पण लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर अभिनेत्री सोमी अली हिच्यासोबत सलमान खान याच्या नावाची चर्चा रंगली. पण सोमी हिने सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले.
त्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची एन्ट्री झाली. पन दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याबद्दल आज देखील चर्चा रंगलेल्या असतात. अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत देखील सलमान खान याचं नातं फार काळ टिकलं नाही… आज सलमान खान एकटाच आयुष्य जगत आहे.
