Salman Khan look: सलमान खान खरंच आजारी? या कारणाचीही चर्चा

Salman Khan Sick look: सध्या सर्वत्र बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अचानक कमी केलेले वजन, चेहऱ्यावर सुरकुत्या असा लूक पाहून सर्वजण चकीत झाले. आता त्याच्या लूकमागे आणखी एक कारण असू शकते असे म्हटले जात आहे.

Salman Khan look: सलमान खान खरंच आजारी? या कारणाचीही चर्चा
Salman khan
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 7:04 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खान उपस्थित होता. पण त्याच्या बदललेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. चेहऱ्यावर सुरकु्त्या, नम झालेल्या डोळे, दुबळे-पातळ शरीर पाहून अनेकांना प्रश्न पडला की सलमान खान आजारी तर नाही? त्याने अचानक इतके वजन का कमी केले आहे? आता याबाबत एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

आणखी एका कारणाची शक्यता

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी सेकंड हँड सिनेमाच्या प्रमोशच्या वेळी बायोपिक विषयी मोठा खुलासा केला होता. त्यांनी भविष्यात कधी जर त्यांच्या जीवनावर सिनेमा आला तर कोणत्या अभिनेत्याने भूमिका साकारावी हे सांगितले होते. ‘मला वाटतं सलमान हे करू शकतो. सलमान खूप गोड आहे. त्याच्या आणि माझ्या काही सवयी सारख्या आहेत. तो माझ्यावर प्रेम करतो’, असे धर्मेंद्र म्हणाले होते. त्यामुळे आता सलमानचा बदललेला लूक पाहून काहींनी धर्मेंद्र यांच्या बायोपिकची तयारी करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सलमान खानच्या आरोग्याची चर्चा शुक्रवारी समोर आली. त्यानी स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (SRA) कार्यालयाला भेट दिली आणि तेथील अत्याधुनिक डेटा संकलन व व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटर (IT सर्व्हर रूम) चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्याने लाभार्थींना घरांची चावीही सुपूर्द केली. सलमानच्या या भेटीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले, पण त्याच्या शारीरिक स्वरूपाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आणि चर्चेचा मुख्य विषय बनले. त्यांचे दुबळे दिसणारे शरीर पाहून चाहते आणि शुभचिंतकांनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत चिंता व्यक्त केली.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सलमानचा लूक पाहून, “ते आजारी दिसत आहेत… देव तुमचे भले करो”, “ते आजारी दिसत आहेत, मला वाटते त्यांना काही आरोग्य समस्या आहे”, “माझ्या किंगला काय झाले?”, “सलमान खानना काय झाले? सुरुवातीला वाटले हे ते नाहीत, पण शेराला पाहिले तर खात्री पटली. त्यांचे वय धर्मेंद्र यांच्यासारखे दिसत आहे”, “काय? हा सलमान खान आहे का? त्याची तब्येत ठीक नाही का? ओह माय गॉड” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Follow Us