Salman Khan: मग तीच व्यक्ती दुसऱ्याशी लग्न..; सलमान खानने सांगितला डेटिंगचा सर्वांत वाईट अनुभव, 15-16 वर्षांपासून झेलल्या वेदना
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने नुकताच कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमध्ये मोठा खुलासा केला आहे. त्याने डेटिंगवर वक्तव्य केले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा कायमच चर्चेत असतो. त्याचा कॉफी विथ करण हा शो तर नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. नुकताच या शोच्या 9व्या सिझनच्या पहिल्याच भागात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने हजेरी लावली. त्यावळे सलमान खानने मजेशीर अंदाजात आमिर खानबाबात वक्तव्य केले. तसेच त्याने डेटिंगच्या चर्चांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
करण जोहरने कॉफी विथ करण या शोमध्ये मजेशीर प्रसंगाची आठवण सांगितली आहे. तो म्हणाला की आमीर खानने म्हटले होते की, सलमान खानचे लग्न लावून देण्यासाठी तो त्याचे हात-पाय बांधून ठेवेल. तर दुसरीकडे, सलमान खानने आमीरचे हात-पाय बांधून ठेवण्याचे ठरवले होते, जेणेकरून तो पुन्हा लग्न करू शकणार नाही. आमीर खानने नुकतेच गौरी स्प्राटसोबत लग्न केले असून, हे त्याचे तिसरे लग्न आहे.
सलमानचे म्हणणे
करण जोहरने सलमानला लग्नाबद्दल प्रश्न विचारला आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित केला, ‘तू अजूनही व्हर्जिन (अविवाहित/लैंगिक संबंध न आलेला) आहेस का?’ यावर सलमान हसून म्हणाला की, त्याने ते विधान अशा अर्थाने केले होते की त्याला त्याच्या डेटिंग आयुष्याबद्दल किंवा नातेसंबंधांबद्दल बोलायचे नाही. तो म्हणाला, “कारण तुम्ही सतत म्हणत असता, ‘तू अमुक व्यक्तीला डेट करत आहेस’… आणि तुम्हाला कधीच माहीत नसते की, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायमची राहणार आहे की नाही. पुढे जाऊन ती व्यक्ती दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करते. वयाच्या १५-१६ व्या वर्षापासून माझ्या मनात हा विचार होता.”
View this post on Instagram
मी कोणालाही दोष देणार नाही
सलमान पुढे म्हणाला की, त्याचे वडील सलीम खान यांनीच त्याला बेडरुममधील टॉक बेडरूममध्ये ठेवण्याचा आणि लिव्हिंग रूममध्ये न आणण्याचा सल्ला दिला होता. पण अभिनेता म्हणाला, “मला वाटत नाही की लोकांना माझ्यासोबत रहायचे आहे. मला कधीतरी मुले होतील. मला कोणीही थांबवले नाही. मला हे हवे होते आणि संपूर्ण जग माझ्या विरोधात गेले अशी तक्रार कोणी करू शकत नाही आणि त्यामुळेच मी जोडीदारासोबत राहू शकलो नाही. मी इतर कोणाला दोष देऊ शकत नाही.”
