
Lucky Actress Sneha Ullal Latest Pics : अभिनेता सलमान खान याच्यासोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी स्क्रिन शेअर केली आहे. एवढंच नाही तर, अनेक नव्या अभिनेत्रींना सलमान खान याने बॉलिवूडमध्ये संधी देखील दिली आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, झरीन खान यांसारख्या अनेक अभिनेत्रींसाठी भाईजान याने बॉलिवूडचे दरवाजे उघडून दिले. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री स्नेहा उल्लाल. स्नेहा उल्लाल हिने ‘लकी’ सिनेमात अभिनेत सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. स्नेहा आणि सलमान यांचा सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा स्नेहा फक्त 18 वर्षांची होती.
स्नेहा उल्लाल हिने वयाच्या 18 व्या वर्षी सलमान खानच्या लकी सिनेमाातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिला ऐश्वर्या राय बच्चन हिची डुप्लीकेट म्हणून ओळख मिळाली. याशिवाय ती सोहेल खानसोबत आर्यन या सिनेमातही दिसली होती. पण स्नेहा हिला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. अखेर अभिनेत्री बॉलिवूडमधून ब्रेक घेतला.
दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला होता. ज्यामुळे स्नेहा हिला अभिनय विश्वाचा निरोप घ्यावा लागला. अभिनेत्री म्हणाली होती, ‘मला ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’ हा गंभीर आजार झाला होता. हा रक्ताशी संबंधित आजार आहे, जिथे माझी रोगप्रतिकारक शक्ती मला अस्वस्थ ठेवायला लगाली होती.’
’30 ते 40 मिनिटांपेक्षा अधिक मी स्वतःच्या पायांवर उभी देखील राहू शकत नव्हती. सिनेमांच्या शुटिंगमुळे माझी प्रकृती अधिक खालावली होती. एका अभिनेत्रीसाठी जी ताकद गरजेची असती, ती माझ्यात नव्हती. मी सतत डान्स किंवा इतर कठीण सीन करु शकत नव्हती. तेव्हा मला उपचार सुरु करावे लागले होते. एक दिवस शुटिंग करून दुसऱ्या दिवशी आजरी पडण्यात काहीही अर्थ नव्हता…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्नेहा उल्लाल हिची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, स्नेहा हिने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर, उल्लासमगा उठासाहमागा या तेलगू सिनेमातून साऊथ सिनेविश्वात पदार्पण केलं. आता ती नव्या प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर स्नेहा उल्ला पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. स्नेहा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.