जंतर-मंतर आधी या विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी झालेला सलमान खान, सर्व मागण्या झालेल्या मान्य
दिल्लीतील जंतर-मंतर आधी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या उपोषणात सहभागी झालेला सलमान खान. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या झालेल्या मान्य. Video होतोय प्रचंड व्हायरल.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर लीक प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जोरदार आंदोलन छेडले होते. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. अखेर रविवारी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रह्लाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
या आंदोलनाची सुरुवात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण करून केली होती. पुढे या आंदोलनाला ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पाठिंबा मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले. देशभरातून विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला समर्थन दिले.
दरम्यान, अभिनेता सलमान खान याने सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावे असे आवाहन केले होते. त्यानंतर काही तासांतच भाजपचे नेते जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले उपोषण सोडले.
या घडामोडींमुळे सलमान खान पुन्हा चर्चेत आला असून, त्याच्याशी संबंधित ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘तारक मेहता…’मध्ये सलमान खानची एन्ट्री
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील 615 ते 620 या भागांमध्ये टपू सेना उपोषणाला बसल्याचे दाखवण्यात आले होते. त्यांची मागणी होती की, त्यांना नवीन क्रिकेट किट मिळावी. मात्र त्यांच्या पालकांनी क्रिकेट किट घेण्यास नकार दिल्याने टपू सेना उपोषणावर ठाम राहिली. गोकुळधाम सोसायटीतील सदस्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही.
Not the first time Salman Khan has ended someone’s hunger strike, TMKOC really is our Simpsons 😭😭 pic.twitter.com/1aoLp1InZG
— isHaHaHa (@hajarkagalwa) July 24, 2026
त्यानंतर मालिकेच्या 621 आणि 622 व्या भागांमध्ये अभिनेता सलमान खान आपल्या ‘रेडी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मालिकेत दाखल झाला होता. सलमानने टपू सेनेची समजूत काढली आणि त्यांना नवीन क्रिकेट किटही भेट दिली. त्यानंतर टपू सेनेने आपले उपोषण मागे घेतले होते. हा भाग त्या काळात प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता आणि आजही त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.