Salman Khan: कोर्ट केसपासून नातेसंबंधापर्यंत, माझ्याविरोधात खूप..; वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सलमान भावूक

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या नुकत्याच पार पडलेल्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आयुष्यातील एका टप्प्यावर सर्वत्र नकारात्मकता पसरली होती, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

Salman Khan: कोर्ट केसपासून नातेसंबंधापर्यंत, माझ्याविरोधात खूप..; वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सलमान भावूक
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 04, 2026 | 9:30 AM

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आज केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहराही म्हणून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे. मात्र, हा प्रवास नेहमीच इतका सोपा नव्हता. नुकत्याच ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने त्याच्या करिअरमधील एका महत्त्वाच्या टप्प्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. ‘मैने प्यार किया’नंतर त्याच्या नावाभोवती निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा आणि ‘10 का दम’ या शोमुळे ती कशी बदलली, याचा किस्सा त्याने स्पर्धकांसोबत शेअर केला.

‘मैने प्यार किया’नंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून नातेसंबंध, कोर्ट केसेस आणि चित्रपटांपर्यंत अनेक गोष्टींवर माध्यमांमध्ये चर्चा होत होती. त्यामुळे त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नकारात्मकता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत त्याला ‘10 का दम’ हा टेलिव्हिजन शो करण्याची ऑफर मिळाली. सुरुवातीला मात्र सलमान हा शो स्वीकारण्यास तयार नव्हता. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या नकारात्मक चर्चेमुळे टेलिव्हिजनवर येणं योग्य ठरेल का, याबाबत त्याच्या मनात संभ्रम होता.

Loading...

सलीम खान यांचा सल्ला

या कठीण काळात सलमानने वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांच्याशी चर्चा केली. ‘10 का दम’ करावा की नाही, असा प्रश्न त्याने वडिलांना विचारला. त्यावर सलीम खान यांनी त्याला त्याच्या संस्कारांवर विश्वास आहे का, असा प्रश्न विचारला. सलमानने होकार दिल्यानंतर वडिलांनी त्याला स्वतःसारखं राहण्याचा सल्ला दिला. शोमध्ये कोणताही बनाव न करता आपला खरा स्वभाव प्रेक्षकांसमोर मांड, असं त्यांनी सांगितलं.

पहा व्हिडीओ-

सलमानने सांगितलं की, ‘10 का दम’च्या एका एपिसोडनंतरच लोकांना त्याचा वेगळा चेहरा पाहायला मिळाला. केवळ त्याने साकारलेल्या चित्रपटातील व्यक्तिरेखांमधून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून प्रेक्षक त्याला ओळखू लागले. 2018 मध्येही सलमानने ‘10 का दम’बद्दल बोलताना टेलिव्हिजनने त्याला स्वतःची ओळख निर्माण करून देण्यास मदत केल्याचं सांगितलं होतं.

सलमानने आठवण सांगताना स्पष्ट केलं की, माध्यमांमध्ये त्याची जी नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती, ती ‘10 का दम’च्या एका एपिसोडनंतर बदलू लागली. त्याने अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’शीही याची तुलना केली. जसं अमिताभ बच्चन यांचं नाव एका टप्प्यावर ‘KBC’शी जोडून पाहिलं जाऊ लागलं, तसंच प्रेक्षकांनी त्यालाही ‘10 का दम’मधून एका वेगळ्या रूपात स्वीकारलं. या अनुभवाचा दाखला देत सलमानने ‘बिग बॉस 20’च्या स्पर्धकांनाही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us