‘ते रात्री यायचे आणि सकाळी जायचे…’, ऐश्वर्याला भेटायला यायचा सलमान, दिग्गज अभिनेत्रीने सांगितलं सत्य

अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी नुकतेच सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘सलमान दररोज रात्री तिला भेटण्यासाठी यायचा.’

‘ते रात्री यायचे आणि सकाळी जायचे...’, ऐश्वर्याला भेटायला यायचा सलमान, दिग्गज अभिनेत्रीने सांगितलं सत्य
Salman Khan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 19, 2025 | 6:10 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी आतापर्यंत सर्वात जास्त लोकप्रिय ठरली आहे. दोघांनीही एकमेकांना अगदी थोड्या वेळासाठी डेट केले असले तरीही त्यांच्या नात्याची आणि नंतर ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगली होती. पण सलमानच्या आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना या प्रेमकहाणीमधील प्रत्येक छोटीशी गोष्ट जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. नुकतेच या दोन्ही स्टार्ससोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिग्गज अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की ते रात्री यायचे आणि सकाळी जायचे…’

हिमानी शिवपुरी यांनी सलमान आणि ऐश्वर्याबद्दल सांगितले

हिमानी शिवपुरी नुकताच रेड एफएमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने आपल्या अनेक चित्रपटांचे किस्से शेअर केले. याच दरम्यान त्यांनी ऐश्वर्या रायबद्दलही वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाल्या की, मी ऐश्वर्याला पहिल्यांदा ‘आ अब लौट चलें’ च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर आम्ही ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ मध्ये एकत्र काम केले.

वाचा: हे काय स्वप्न नाही बरं का; गुलिगत सूरज चव्हाणचं ठरलं लग्न, तिच्यासोबतचा खास फोटो

सेटवर ऐश्वर्याला भेटायला यायचे सलमान

हिमानी पुढे म्हणाल्या की, ‘एकदा मी ऐश्वर्यासोबत हैदराबादमध्ये शूटिंग करत होते. तेव्हा सलमान अनेकदा सेटवर यायचे. त्या वेळी ऐश्वर्या आणि सलमान खूप चांगले मित्र होते, म्हणून सलमान दररोज रात्री यायचे आणि सकाळी निघून जायचे. तसेच जेव्हा एकदा ऐश्वर्या अभिनेता अभिषेक बच्चनसोबत शूटिंग करत होती, तेव्हाही सलमान खान माझ्याकडे आले होते.’

‘स्वतःला खूप सुंदर समजते’

अभिनेत्रीने सांगितले की, सलमान येऊन मला म्हणायचे की, ‘काय आहे हे? याला समजाव जरा. वहिदा रहमानला बघ… त्या स्वतःला खूप सुंदर समजतात…’ मी त्यांना म्हणायचे, शांत व्हा, थोडे गप्प बसा…’ त्यानंतर हिमानी यांनी दोघांच्या ब्रेकअपबाबत म्हटले की, ‘याबाबत मला देखील काही माहिती नाही, कदाचित त्यांच्यात काही गोष्टी जुळल्या नसाव्यात.’