सलमान खानने घातला फाटका, जुना बूट; फोटो समोर येताच प्रचंड ट्रोलधाड, शुजची किंमत कळताच ट्रोलर्सची बोबडी वळली

सलमान खानचा नुकताच एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने फाटलेले आणि जुने बूट घातले आहेत. त्यावरून तो प्रचंड ट्रोल झाला आहे, मात्र या बुटाची खरी किंमत समोर येताच ट्ररर्संना प्रचंड धक्का बसला आहे.

सलमान खानने घातला फाटका, जुना बूट; फोटो समोर येताच प्रचंड ट्रोलधाड, शुजची किंमत कळताच ट्रोलर्सची बोबडी वळली
salman khan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 06, 2026 | 3:22 PM

अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. सलमान खानच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्या चाहत्यांची बारीक नजर असते. सलमान खानने जर एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर केला किंवा तो जर एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये सहभागी झाला तर सर्वांचं लक्ष त्याच्यावरच असतं. नुकताच सलमान खान याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक जण सलमान खानला ट्रोल करत आहेत, तर काहीजण हे सलमान खानचं कौतुक देखील करत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि सलमान खानला ट्रोल का केलं जात आहे?

अनेकांना लाइमलाइटमध्ये राहायला आवडतं, सोशल मीडियावर जो नवा ट्रेंड येईल, त्यानुसार असे लोक आपल्या लूकमध्ये कपड्यांमध्ये आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल करत असतात. परंतु काहीही फॅशनचे ट्रेड असे असतात की हे नवे ट्रेड अशा लोकांच्या समजण्याच्या पलिकडे असतात. असंच काहीसं सलमान खान याला ट्रोल करण्यांच्याबाबतीमध्ये घडलं आहे.

 

नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेता सलमान खानचा एअर पोर्टवरील एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो काही लोकांशी संवाद साधताना दिसून येत आहे. मात्र त्याने त्याच्या पायात जे बूट घातले आहेत, ते फाटलेले आहेत जुने आहेत. यावरून सलामन खानला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. मात्र जेव्हा या बुटांची किंमत समोर आली तेव्हा ट्रोलर्सला प्रचंड धक्का बसला आहे.एवढा मोठा सुपरस्टार फाटलेले आणि जुने बूट कसा घालू शकतो असा सवाल त्याच्या ट्रोलर्सने उपस्थित केला होता. मात्र सलनाम खान याने जे बुट घातले आहेत, ते अतिशय महागडे आहेत, या बुटाची किंमत 1 लाख 20 हजार ते 1 लाख 50 हजारांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. ही किंमत ऐकून ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली आहे. हे एक खास प्रकारचे बूट आहेत, ते जुने आणि फाटलेले आहेत, असं वाटतं मात्र त्याची किंमत ही प्रचंड आहे.

Follow Us