AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही परिस्थितीत मुंबईतल्या या भागात कुर्बानीला परवानगी देऊ नका, भाजप नगरसेविका प्रिती साटम यांची आक्रमक भूमिका

Bjp Corporator Priti Satam : कुर्बानी विरोधात भाजप नगरसेविका प्रिती साटम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून कुर्बानीला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. भाजपच्या सात आमदारांनी देखील मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

कोणत्याही परिस्थितीत मुंबईतल्या या भागात कुर्बानीला परवानगी देऊ नका, भाजप नगरसेविका प्रिती साटम यांची आक्रमक भूमिका
priti Satam
| Updated on: May 27, 2026 | 8:28 AM
Share

बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यावरुन मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार राजकारण सुरु आहे. मीरा रोडमध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये जोरदार वादावादी झाली. विषय हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर आता गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात बकऱ्याच्या कुर्बानीला विरोध करण्यात आला आहे. प्रभाग क्र 52 च्या नगरसेविका प्रिती साटम यांनी गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम परिसरातील सॅटेलाईट गार्डन फेज-२ मधील आझाद नगर डी-३ इमारतीच्या आवारात उघड्यावर बकरा कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सहाय्यक आयुक्त, पी (दक्षिण) विभाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेच्या विद्यमान धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी पशुवध करताना स्वच्छता, आरोग्य सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन तसेच शाळा, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील संवेदनशीलता लक्षात घेणे बंधनकारक आहे. संबंधित ठिकाणी उघड्यावर कुर्बानी झाल्यास दुर्गंधी, अस्वच्छता, रोगराईचा धोका तसेच स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता

परिसरात शाळा आणि धार्मिक स्थळं असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर तसेच परिसरातील सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीही नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित परवानगी रद्द केली होती.

स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घ्या

सार्वजनिक आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता, यावर्षीदेखील संबंधित ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कुर्बानीसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी प्रिती सातम यांनी प्रशासनाकडे केली आहे.

भाजपच्या सात आमदारांनी लिहिलं पत्र

मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसह भाजपच्या सात आमदारांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी रहिवाशी संकुल, हाऊसिंग सोसायटी आणि चाळीत बकऱ्यांची कुर्बानी देण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. पराग शाह, मनीषा चौधरी, अतुल भातखळकर, मिहिर कोटेचा, माजी खासदार किरीट सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून कुर्बानीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.