
साऊथ अभिनेत्री समांथा तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटानंतर तिचे नाव चर्चेत आले होते ते दिग्दर्शक राज निदिमोरू सोबत. त्यानंतरही हे दोघेजण अनेकदा सोबतहि दिसले. त्यामुळे नक्की त्यांच्यात काय नातं आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते.
समांथा किंवा राजचा तो फोटो व्हायरल
पण त्यावर समांथा किंवा राजने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता पुन्हा एकदा या दोघांची नावं चर्चेत आली आहेत. कारण अभिनेत्री समांथाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने या वर्षी घेतलेल्या धाडसी निर्णयांबद्दल आणि अनुभवांबद्दल सांगितले आहे. तथापि, पोस्टमधील सर्वात चर्चेत आलेला फोटो म्हणजे दिग्दर्शक राज निदिमोरू सोबतचा. या फोटोमुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवांना उधाण आले आहे.
फोटोमध्ये समांथा काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर राज काळ्या सूटमध्ये दिसत आहे. दोघेही कॅमेऱ्याकडे पाहत आहेत. राजचा एक हात समांथाच्या कमरेवर आहे आणि समांथाने त्याला मिठी मारत फोटो काढला आहे. हा फोटो या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या समांथाच्या फ्रैगरेंस लाँच कार्यक्रमातील आहे. तिने या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, तिने गेल्या काही वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा आणि छोट्या यशांचा आनंद साजरा करण्याबद्दल सांगितले.
समांथाने पोस्टने वेधलं सर्वांचे लक्ष
समांथाने पोस्टला कॅप्शन दिले, “मित्र आणि कुटुंबाने वेढलेले. गेल्या दीड वर्षात, मी माझ्या कारकिर्दीतील काही सर्वात धाडसी पावले उचलली आहेत. मी जोखीम घेतली आहे, माझ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवला आहे आणि वाटेत शिकलो आहे. आज, मी हे छोटे विजय साजरे करत आहे. अशा प्रामाणिक आणि मेहनती लोकांसोबत काम केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे, ही फक्त सुरुवात आहे.”
फोटो पाहून नेटकऱ्यांच्या चर्चां
तिची ही पोस्ट आणि फोटो पाहून नेटकऱ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. समांथा आणि राज यांनी त्यांचे नाते अधिकृत केले आहे का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. एका युजरने लिहिले, “हे आता अधिकृत झाले आहे का” तर दुसऱ्याने लिहिले “जर हे अधिकृत असेल तर मला खूप आनंद होईल.”
हे लक्षात घेण्यासारखे आहे की समांथा आणि राज यांच्या नात्याबद्दल गेल्या काही काळापासून अफवा पसरत आहेत. द फॅमिली मॅन २ या वेब सिरीजमध्ये एकत्र काम केल्यामुळे दोघे जवळ आले. असे म्हटले जाते की मालिकेपासून त्यांनी एक मजबूत बंध कायम ठेवला आहे. राजने समांथाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपट शुभममध्येही सहकार्य केले होते.
जरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतेही सार्वजनिक विधान केलेले नाही, परंतु सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोंमुळे आणि ते सतत एकत्र दिसल्यामुळे, ही चर्चा सुरूच आहे.