समंथाचा पती राज की पूर्व पती नाग चैतन्य.. कोण सर्वांत श्रीमंत? एकाची संपत्ती 1000 कोटींच्या पार

अभिनेत्री समंथाचा पती राज निदिमोरू की नाग चैतन्य.. या दोघांपैकी कोण सर्वांत श्रीमंत आहे, कोणाकडे किती संपत्ती आहे, याबद्दल जाणून घेऊयात.. नाग चैतन्यला घटस्फोट दिल्याच्या चार वर्षांनंतर समंथाने नुकतंच दुसरं लग्न केलं आहे.

समंथाचा पती राज की पूर्व पती नाग चैतन्य.. कोण सर्वांत श्रीमंत? एकाची संपत्ती 1000 कोटींच्या पार
समंथा- राज निदिमोरू, नाग चैतन्य
Image Credit source: Instagram
Updated on: Dec 03, 2025 | 1:12 PM

घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. समंथा आणि राज यांनी ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘सिटाडेट: हनी बनी’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलंय. राजचंही हे दुसरं लग्न आहे. समंथा तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे, त्यामुळे तिचा पती राज कोण आहे, त्याची संपत्ती किती आहे, तो काय करतो याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. काहीजण त्याची तुलना समंथाचा पूर्व पती नाग चैतन्यशी करत आहेत. राज आणि नाग चैतन्य या दोघांपैकी श्रीमंत कोण आहे, असाही सवाल काहींनी केला आहे.

राज की नाग चैतन्य, कोण सर्वाधिक श्रीमंत?

राज निदिमोरूबद्दल बोलायचं झाल्यास, त्याची एकूण संपत्ती 80 ते 85 कोटी रुपये इतकी आहे. तर तेलुगू स्टार नाग चैतन्यची संपत्ती तब्बल 1000 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. त्याच्या संपत्तीचा आकडा आधी 154 कोटी रुपये इतका होता. परंतु ताज्या रिपोर्ट्सनुसार, हा आकडा 1000 कोटींच्या पार गेल्याचं कळतंय.

नाग चैतन्यच्या इतक्या संपत्तीचं स्रोत हे केवळ त्याचे चित्रपट नाहीत, तर अक्किनेनी आणि दग्गुबती कुटुंबाच्या वारसाचं यात मोठं योगदान आहे. तो हैदराबादच्या प्रसिद्ध अन्नपूर्णा स्टुडिओजच्या वारसांपैकी एक आहे. सात एकरांमध्ये पसरलेला हा फिल्म प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन हब 200 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा असल्याचं समजतंय.

चित्रपट आणि बिझनेस

नाग चैतन्य एका चित्रपटासाठी किंवा वेब सीरिजसाठी जवळपास पाच ते दहा कोटी रुपये मानधन स्वीकारतो. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत महागड्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. 2023 मध्ये त्याने ‘धूता’ या सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केलं होतं. या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाशिवाय नाग चैतन्य बिझनेसमध्येही सक्रिय आहे. ‘शोयू’ नावाची त्याची क्लाऊड किचन चेन हैदराबादमध्ये खूप लोकप्रिय आहे. देशातील इतरही मोठ्या शहरांमध्ये त्याचा विस्तार करण्याची प्लॅनिंग सुरू आहे.

आलिशान लाइफस्टाइल

नाग चैतन्य हैदराबादच्या सर्वांत पॉश ज्युबिली हिल्स परिसरातील एका आलिशान बंगल्यात राहतो. त्याच्या कार कलेक्शनमध्ये फरारी F430, पोर्श 911GT3 RS, मर्सिडीज बेंज G Class G63 AMG यांसारख्या आलिशान आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे. नाग चैतन्यला बाइक्सचीही खूप आवड आहे.