समंथाने सर्वांसमोर थेट साधला सवतीवर निशाणा? नात्यांबद्दल मोठं वक्तव्य, सर्वत्र व्हायरल होतोय अभिनेत्रीचा Video
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर दुसरा संसार थटला आहे. तर नागा चैतन्य याने देखील अभिनेत्री शोभिता हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात समंथा हिने नात्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

झगमगत्या विश्वात एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समंथा हिने अनेकदा नात्यांवर वक्तव्य केलं आहे. आता देखील अभिनेत्रीने रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे. हैदराबादमध्ये आगामी ‘मा इन्टी बंगारम’ (Maa Inti Bangaram) सिनेमाच्या यश सोहळ्यादरम्यान अभिनेत्रीने नातेसंबंधांबाबत काही अशी विधानं केली, ज्यामुळे ती शोभिता धुलिपाला हिच्याकडे तर इशारा करत नाही ना? अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली. शोभिता ही नागा चैतन्य याची दुसरी पत्नी आहे.
नात्यांबद्दल समंथा काय म्हणाली?
याावेळी बोलताना समंथा हिने शोभिता हिचं नाव घेतला नाही. पण नात्यांबद्दल बोलताना समंथा असं म्हणाली की, ‘जोडीदारमुळेच आपलं अस्तित्व आहे… हे माननं महिलांनी अखेर बंद केलं पाहिजे. करियर आणि नाती तुमच्या हातात आहेत, पण अनेकदा नात्यांचा गुंता होतो आणि सर्वकाही तुमच्या नियंत्रणात नसतं… एक नातं सांभाळण्यासाठी दोघांची गरज असते… मी एक गोष्ट शिकली आहे आणि ती म्हणजे, स्वतःवर विश्वास असणं आणि मी स्वतःसाठी पूर्ण आहे.’ असं समंथा म्हणाली.
पुढे समंथा म्हणाली, ‘एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला योग्य जोडीदार नक्की मिळेल. मात्र, जर तुम्ही अशा कोणाचा शोध घेत असाल जो तुम्हाला ‘पूर्ण’ करेल, तर ते योग्य नाही. यामुळे अपेक्षा वाढतात आणि नात्याचं नुकसान होऊ शकते.’ असं देखील समंथा व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
सध्या समंथा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी याचा संबंध शोभिता धुलिपालाशी जोडायला सुरुवात केली. सांगायचं झालं तर, 2024 मधील तिच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये शोभिताने म्हटलं होतं की, माणूस अपूर्ण असतो आणि त्याला पूर्ण करण्यासाठी दुसरे कोणीतरी येते.
समंथा आणि शोभिता
शोभिता धुलिपालाने नागा चैतन्यशी लग्न केलं आहे, नागाचं यापूर्वी समंथाशी लग्न झालं होतं. समंथा आणि नागा चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. दरम्यान, समंथाने डिसेंबर 2025 मध्ये निर्माता राज निदिमोरू यांच्याशी विवाह केला. या जोडप्याने कोईम्बतूरमधील ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात एका खाजगी समारंभात विवाह केला. आता समंथा लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
